धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
अनंतराव क्किलनफुएल इंडिया प्राय लिमिटेड राजुरा, बळीवंश बायोफुएल प्राय लिमिटेड कोरपना, तीर्थरूप बायोफुएल प्राय लिमिटेड बल्हारशाह, कृषीधारा बायोफुएल प्राय लिमिटेड पोंभुर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा गडचांदुर येथे मीरा क्किलनफुएल लिमिटेड या कंपनीच्या अंतर्गत जुळलेल्या प्रत्येक तालुक्यातील ग्रामउदयोजकांच्या सामंजस्य कराराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अँड. वामनराव चटप, विशेष अतिथी म्हणून माजी आमदार अँड. संजय धोटे, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूरची नगराध्यक्षा सविता टेकाम, कोरपना येथील कृषी अधिकारी डमाळे, राजुरा येथील कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले, बल्लारपूर येथील कृषी अधिकारी चव्हाण, पोंभुर्णा येथील कृषी अधिकारी निमोड, उपविभागीय कृषी अधिकारी पवार, माजी जिप सभापती अरुण निमजे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विश्वास देशमुख, संजय पिंपळकर, संजय शेळके, हरीष राजूरकर यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख विषेश अतिथी म्हणून मुल तालुक्याचे एमपीओ संचालक शेखर श्रीवास्तव, हिंघनघाट तालुक्याचे एमपीओ संचालक राईकवार, गलांडे, राडे, भद्रावती तालुक्याचे एमपीओ संचालक फुलझेले, पोंभुर्णा तालुक्याचे एमपीओ संचालक पिंपळशेंडे, सिंदेवाही तालुक्याचे एमपीओ संचालक मा़ंडवकर, चिमुर तालुक्याचे एमपीओ संचालक बहाते, समुद्रपुर तालुक्याचे एमपीओ संचालक थुल, देवळी तालुक्याचे एमपीओ संचालक कांबळे, गोंडपिपरी तालुक्याचे एमपीओ संचालक कोमल्ला, गडचिरोली तालुक्याचे एमपीओ संचालक हजारे, सावली तालुक्याचे एमपीओ संचालक गेडाम यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन अनंतराव क्किलनफुएल इंडिया प्राय लिमिटेडचे संचालक प्रशांत चटप, नागेश चटप, बळीवंश बायोफुएल प्राय लिमिटेड चे विलास कुडे, अक्षय कुडे, मोहनीश कुडे, तीर्थरूप बायोफुएल प्राय लिमिटेड चे डॉ यशवंत कन्नमवार, मोहित कन्नमवार, कृषीधारा बायोफुएल प्राय लिमिटेड चे संचालक मुकेश पिंपळशेंडे, लुतेश उपरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रास्ताविक प्रशांत चटप यांनी केली. त्यांनी एमसीएल कंपनीचे व्हिजन 2030 पर्यंत भारताला इंधनात स्वयंपूर्ण करणे असे सांगितले. एमसीएल कंपनीचे रचनाकार शिल्पकार डॉ. शाम घोलप, लवेश जाधव, प्राची ढोले, शेलार व टीमने इंधन क्रांतिचे उदिष्ट साध्य करण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना वामनराव चटप म्हणाले की विदर्भात शेतकरी बांधवाच्या आत्महत्या सर्वात जास्त आहे आणि हे बदलायचे असतील तर पारंपरिक पिक पद्धती बदलने आवश्यक आहे. एमसीएल कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक गावातच हत्ती गवताच्या लागवडीतून शेतकरी बांधवांच्या आथिर्क उत्पन्नात वाढ होणार असल्याने पैशाचे चलनवलन होउन इतर व्यवसाय भरभराटीस येणार आहे. सोबतच इंधनापोटी भारत देशाला कोट्यवधी डॉलर खर्च करावा लागतोय त्याची बचत होईल. आभार प्रदर्शन विलास कुडे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.