Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरोनामुळे बंद झालेली जोगापूर जंगल सफारी पुन्हा सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरोनामुळे बंद झालेली जोगापूर जंगल सफारी पुन्हा सुरू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - कोरोना मुळे बंद असलेली जोगापूर जंगल सफारी आज पा...

  • कोरोनामुळे बंद झालेली जोगापूर जंगल सफारी पुन्हा सुरू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
कोरोना मुळे बंद असलेली जोगापूर जंगल सफारी आज पासून परत सुरू करण्यात आली असून वनप्रेमी, पर्यटकांनी जंगल सफारीचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल व वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनी केले आहे. 
मुख्य वनसंरक्षक एन प्रविणकुमार यांच्या संकल्पनेतून उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांचे मार्गदर्शनात मध्य चांदा वन विभागाचे वन्यजीव व विविध वनसंपदेने नटलेल्या प्रादेशिक वनक्षेत्र असलेल्या राजुरा तालुक्यातील प्रसिद्ध जोगापूर वनपर्यटन सफारी मागील वर्षी सुरू करण्यात आली होती. जंगल सफारीला पर्यटकांचा उत्तम प्रतिसादही मिळत होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या पदुर्भावाने जंगल सफारी बंद ठेवण्यात आली होती. 
मुख्य वनसंरक्षक एन प्रविणकुमार, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार आजपासून परत जोगापूर जंगल सफारी सुरू करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे यांचे हस्ते या सफारीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल, वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, संयुक्त वनव्यवस्थापन समिती सिरसीचे अध्यक्ष भारत सिडाम, संतोष कुंदोजवार, सागर भटपल्लीवार, क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते, नरेंद्र देशकर तथा सर्व वनरक्षक, वनमजुर उपस्थित होते. 
या सफारी करिता वाहन शुल्क 500 रुपये आणि गाईड शुल्क 300 रुपये असे 800 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. या सफारीमुळे या वनक्षेत्रातील माहिती तसेच अस्वल, वाघ, चितळ, रानकुत्रे, रानगवा इत्यादी वन्यजीवांचे दर्शन सुद्धा होऊ शकते. जोगपूरच्या विविध वनस्पतीने नटलेल्या जंगल सफारीचा आनंद अधिकाधिक वन्यप्रेमींनी घ्यावा असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top