Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: राज्यात जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राज्यात जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करा भारतीय जनता युवा मोर्चा ने केली मागणी योजनेने ग्रामीण भागातील भूजल पातळीत वाढ होऊन लाखो शेतकऱ्या...

  • राज्यात जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करा
  • भारतीय जनता युवा मोर्चा ने केली मागणी
  • योजनेने ग्रामीण भागातील भूजल पातळीत वाढ होऊन लाखो शेतकऱ्यांना झाला सिंचनासाठी लाभ
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गड़चांदूर -
शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार अभियान योजना सुरू केली होती. परंतु 2019 नंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सदर योजना पुढे ढकलून शेतकऱ्यांच्या विकास कामात अडथळे निर्माण केले आहे, असा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाने राज्य सरकारकडे जलयुक्तची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. एक निवेदनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताची जलयुक्त शिवार योजना पूर्ववत सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे..
या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून  सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या माध्यमातून राज्यात नाले खोदणे, तलाव खोदणे, सिमेंट बंधारे बांधणे आदी कामे करण्यात आली.
जलयुक्त शिवार अभियान योजनेमुळे वरील योजना अनेक गावांमध्ये राबवून लाखो शेतकऱ्यांना लाभ झाला असून, ग्रामीण भागातील भूजल पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ झाला आहे. नाला खोदल्यामुळे पुराच्या वेळी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेले नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखाने जगत होते. परंतु 2019 नंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरांनी सदर योजना स्थगित केल्याने उर्वरित गावातील शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले.
त्यामुळे सदर योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. निवेदन देताना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोडखे, अमित गुंडावार, प्रदेश सचिव अनिल डोंगरे उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top