Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: मांडवा येथे कोरपना तहसिल कार्यालयाचे महाराजस्व अभियान संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मांडवा येथे कोरपना तहसिल कार्यालयाचे महाराजस्व अभियान संपन्न  आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रांचे वाटप धनराजसिंह शेखावत - आम...

  • मांडवा येथे कोरपना तहसिल कार्यालयाचे महाराजस्व अभियान संपन्न 
  • आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रांचे वाटप
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गड़चांदूर -
महाराजस्व अभियान अंतर्गत तहसील कार्यालय कोरपनाच्या माध्यमातून मौजा मांडवा येथे शासन आपल्या दारी ही भुमिका घेऊन नागरिकांना उपयोगी दाखले, प्रमाणपत्रे यांचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यात शैक्षणिक दाखले, जातीचे प्रमाणपत्र, नानक्रिमिलियर, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, तसेच अन्य कामाकरिता उपयोगी पडणारे शेतकरी दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, अल्पभूधारक प्रमाणपत्र, भुमिहिन प्रमाणपत्र, नवीन रेशनकार्ड/ शिधापत्रिका इत्यादी प्रमाणपत्रे नागरिकांना आदिंचा समावेश होता. तसेच वैद्यकीय विभागाअंतर्गत येथे कोविंड लसीकरण करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी उपसभापती सिंधुताई आस्वले, जिप सदस्य विनाताई मालेकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसिलदार महेंद्र वाकलेकर, गटविकास अधिकारी बैरमवार, जुगल पाटील जुमनाके, सिताराम कोडापे, सुरेश पा. मालेकर, संभाजी पा. कोवे, लक्ष्मीबाई, नायब तहसीलदार प्रवीण चिडे, अन्नपुरवठा विभागाचे निरीक्षक सविता गंभीरे, तालुका कृषी अधिकारी दमाले, वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुणी मॅडम तलाठी, मंडल अधिकारी, पंचायत समिती विभागाचे अधिकारी, पत्रकार व गावकरी मंडळी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top