Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपन्यात ४ कोटी ५५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपन्यात ४ कोटी ५५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गड़चांदूर - आमदार सुभाष धोटे यांच्या...

  • कोरपन्यात ४ कोटी ५५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गड़चांदूर -
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोरपना तालुक्यात ४ कोटी ५५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यात मौजा लोणी लोणी फाटा ते लोणी गाव पर्यंत डांबरीकरण करणे १ कोटी ८५ लक्ष, माथा येथे जिल्हा परिषद शाळा एका खोलीचे बांधकाम करणे १ कोटी २० लक्ष रुपये निधी च्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. माथा येथे स्थानिक निधी अंतर्गत १५ लक्ष रुपयाचे सामजिक सभागृह बांधकाम करणे, खनिज विकास निधी अंतर्गत २० लक्ष रुपयाच्या वाचनालय इमारतीचे बांधकाम करणे, आदिवासी शेत्रातील अर्थसंकल्पीय निधी सन २०-२१ अंतर्गत परसोडा ते रायपूर कोठोडा (खुर्द) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १ कोटी, तर नक्षलग्रस्त निधीअंतर्गत परसोडा स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे ५ लक्ष, जनसुविधा निधी अंतर्गत आनंदराव चांदेकर ते तुकाराम नगराळे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता बांधकाम करणे ४ लक्ष, इस्तारी गुंज वारते कष्ट जलद गेमवार यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रेट इन रस्ता बांधकाम करणे ३ लक्ष, तांडा वस्ती सुधार फंड निधी अंतर्गत नरसिंग ट्रिपल दीवार ते पुरुषोत्तम बोकडे व केलम पवार ते महादेव भोयर यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता बांधकाम करणे ३ लक्ष, खनिज विकास निधी अंतर्गत समाज मंदिर बांधकाम करणे १० लक्ष रुपये अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी उपसभापती सिंधू आस्वले, जिप सदस्य कल्पना पेचे, विना मालेकर, माजी जिप सदस्य उत्तमराव पेचे, माजी सभापती श्याम रणदिवे, संभा पा कोवे, कृ.उ.बा.स संचालक भाऊराव पा.चव्हाण, सरपंच राम ठाकरे, जेष्ठ नेते सुरेश पा. मालेकर, उपसरपंच अनिता काळे, घनशाम नांदेकर, विजय पिपळशेंडे, मुन दिनकरराव मुसळे, किशोर सातपुते, संजय पिपळशेंडे यासह गावकरी उपस्थित होते..

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top