- पंजाब काँग्रेस सरकारचा महानगर भाजपाने केला निषेध
- पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेसाठी महानगर भाजपाने घातले देवाला साकडे
- महाकालीमातेचे केले पूजन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे महाकाली मातेचे विधिवत पूजन करण्यात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुक्षिततेसाठी व सुदृढ आरोग्यासाठी साकडे घालण्यात आले. महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात याच वेळी निदर्शने आंदोलन करून बंगाली कॅम्प चौक येथे पंजाब सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ दीपक भट्टाचार्य, मनोरंजन रॉय, अनुप भट्टाचार्य, चंदन पाल, संतोष चक्रवर्ती, निहार हलदार, बिलाई चक्रवर्ती, कविता सरकार, महेंद्र जुमडे, ओमाते माझी, प्रमोद रॉय, सपन सरकार, दीपक विश्वास, परितोष मिस्त्री यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले, पंजाबात शेतकऱ्यांनी सुरक्षाकवच भेदून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता रोकला. आंदोलक शेतकऱ्यांनीं विरोधाची भूमिका घेतल्याने मोदींना फिरोजपुर यातील रॅली रद्द करावी लागली. सुदैवाने अनुचित प्रकार घडला नाही. या प्रकारास पंजाब सरकार दोषी आहे. पंतप्रधान मोदींवर हा एक प्रकारे हल्लाच होता. त्यामुळे भाजपा पंजाब सरकारचा व काँग्रेसचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक विचार आहे. त्यांच्या नेतृत्वात देश प्रगती करीत आहे. जागतिक पातळीवर मोदींनी नावलौकिक मिळविले असून सम्पूर्ण जगाला त्यांची गरज आहे. म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी व सुदृढ आरोग्यासाठी महाकाली पूजन करण्यात येऊन देवाला साकडे घालण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.