Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 'मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो!' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ घसरली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो!' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ घसरली नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्याने ठ...


  • 'मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो!'
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ घसरली
  • नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्याने ठिणगी
  • भाजपाच्या गोटात संतप्त पडसाद व्हीडिओ व्हायरल होताच पटोलेचा घूमजाव
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
भंडारा -
'मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो', असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे सोमवारी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या वर्तुळात संतप्त पडसाद उमटले. आपल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण होत असल्याचे दिसून येताच पटोले यांनी, मी मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोललो, पंतप्रधानांबाबत नाही, असा खुलासा केला. भाजपाचे खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार करून अटक करण्याची मागणी केली आहे. 
44मी माझ्या 30 वर्षांच्या राजकीय जीवनात कोणतीही शाळा उघडली नाही, ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला मदतच केली आहे, सांगत मी मोदींना मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
गावगुंडाविषयी बोललो! पंतप्रधानांविषयी नव्हे - विरोध होताच पटोलेचा घूमजाव
भंडारा जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण आहे. काही लोक एका गावगुंडाची तक्रार माझ्याकडे करीत होते. त्याचेही नाव मोदी आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी तुमच्यासोबत आहे. वेळ आल्यास मी मोदीला बोलू शकतो, मारू शकतो, हे वक्तव्य गावगुंडाबद्दल आहे. माझे ते वक्तव्य देशाच्या आदरणीय पंतप्रधानांबद्दल नसल्याचे पटोलेने स्पष्ट केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top