Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पंतप्रधान मोदींना शिवीगाळ प्रकरणी भाजपा आक्रमक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पंतप्रधान मोदींना शिवीगाळ प्रकरणी भाजपा आक्रमक आ. नाना पटोले यांचेवर गुन्हा दाखल करा महानगर भाजपाची मागणी राजुरात माजी आमदार अँड. संजय धोटे ...

  • पंतप्रधान मोदींना शिवीगाळ प्रकरणी भाजपा आक्रमक
  • आ. नाना पटोले यांचेवर गुन्हा दाखल करा
  • महानगर भाजपाची मागणी
  • राजुरात माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या नेतृत्वात भाजपा राजुरा शिष्टमंडळाद्वारे केली मागणी
  • घुग्गुस मध्येही निवेदन देत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर / राजुरा / घुग्गुस -
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना मारण्याची भाषा केली. या प्रकारामुळे भाजपाप्रेमींचेच नाहीतर समस्त देशबांधवांचे मन दुखावले आहे. मीडियात चर्चेत राहण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर उतरणे, हा लोकशाहीचा अपमान आहे. म्हणून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आ.नाना पटोले यांचेवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, महानगर तर्फे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. सोबतच यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महासचिव ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,ऍड हरीश मंचलवार यांची उपस्थिती होती.
डॉ गुलवाडे म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चे अध्यक्ष व साकोली येथिल आमदार नाना पटोले यांनी साकोली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्वाच्य शिवीगाळ केली व मी ’मोदींना मारूही शकतो अशा प्रकारचे वक्तव्य करून भाजप कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. नाना पटोलेंच्या या घृणास्पद वक्तव्या बद्दल व देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केल्या बद्दल भाजपा त्यांच्या तीव्र शब्दात निषेध करते. आ.नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार नोंदवुन गुन्हा दाखल करा. अन्यथा भाजपा आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात अपशब्द वापरल्या बद्दल कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा
  • माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात भाजपा राजुरा शिष्टमंडळाद्वारे केली मागणी
राजुरा -
कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिनांक 16 जानेवारी 2022 ला सायंकाळी वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणूक प्रचारा दरम्यान व्हिडीओ क्लिपवर बातमी प्रकाशित झाली होती, सदर बातमी मध्ये भंडारा जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान प्रचार करतांना आम जनतेत सार्वजनिक ठिकाणी नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी मारू शकतो, मी त्यांना शिवा घालतो, अशा अशब्दाची जाहीर वाच्यता केली, तमाम भारतीय जनता पार्टी तथा सर्व सामान्य जनतेला पंतप्रधाना बद्दल अपशब्द बोलून अवमानीत केल्या मूळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, ही बाब अतिशय गंभीर असुन, यासंदर्भात राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राजुराच्या वतीने पोलीस निरीक्षक राजुरा यांना निवेदन देण्यात आले व नाना पटोले यांच्या वर गुन्हा दाखल करून अटक करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.
यावेळी भाजपचे वतीने निषेध नोंदवला व शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिले, याप्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, भाजपचे नेते महादेव तपासे, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय उपगणलावार, माजी नगरसेवक राधेश्याम अडानिया, माजी नगरसेवक राजेंद्र डोहे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, ग्रामपंचायत सदस्य रवि गायकवाड, युवा नेते गणेश रेकलवार, सय्यद कुरेशी,पराग दातारकर, सचिन बैस, प्रकाश आस्वले, जनार्धन निकोडे, नितीन बामरटकर, संजय समर्थ, अरुण लोहबळे, संदीप मडावी आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • घुग्गुस मध्येही निवेदन देत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
काही दिवसांआधी, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाशी खेळ करण्याची सडकी मानसिकता काँग्रेसची होती नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कॉंग्रेसी नेत्यांमध्ये किती असूया भरली आहे. हे अशा निंदनीय घटनांमधून वारंवार सिद्ध होते. भारताचे पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेतृत्व करतात. पंतप्रधान पदावरची व्यक्ती कोणत्याही विशिष्ट राजकिय पक्षापुरती मर्यादित राहत नाही. देशाच्या पंतप्रधानांचा सन्मान करणे. हे प्रत्येकाचं कर्त्तव्य आहे. मात्र अश्यातच 
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व साकोली येथील आमदार नाना पटोले यांनी १६ जानेवारी २०२२ रोजी भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना, “आता आपली ताकद वाढली असून, आपण पंतप्रधान मोदी यांना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो.” अशा वल्गना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा चंद्रपुर जिल्हा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते. नाना पटोलेंच्या या घृणास्पद वक्तव्याबद्दल व देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात आज घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची विनंती केली. यावेळी, माजी सरपंच संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, विनोद चौधरी, श्रीकांत पांडे, नरेंद्र कांबळे यांसह आदि मंडळी सोबत होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top