- कमलापूर येथील राज्यातील एकमेव हत्ती कॅम्पतून 11 हत्तीचे स्थलांतरण
- विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे निषेध
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या कमलापूर येथील राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प मधील हत्ती अन्यत्र नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय रद्द करून विदर्भाचे हे वैभव हिरावून घेऊ नये, अशी मागणी करीत सरकारने घेतलेल्या या विदर्भ विरोधी निर्णयाचा विदर्भ राज्य आंदोलन समितीने निषेध केला आहे. अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे हत्ती कॅम्प आहे. 1962 साली एक हत्तीण कमलापूरला आणण्यात आली होती. त्यानंतर काही वर्षांनी आलापल्लीवरून एक हत्ती आणला. आता त्यांचे कुटुंब चांगले विस्तारून आठ जणांचे झाले आहे. येथे वयोवृद्ध हत्तीणीपासून तर छोट्या हत्तीपर्यंत सर्व वयोगटाचे हत्ती कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये पहायला मिळतात. सध्या येथे आठ हत्ती आहेत. शेजारच्या आलापल्ली येथे तीन हत्ती आहेत. हे अकराही हत्ती गुजरात राज्यात रिलायन्स इंडस्ट्रीज उभारत असलेल्या
प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुर्वी असा स्थलांतरण करण्याचा निर्णय झाला होता. मात्र तो रद्द झाला होता. वास्तविक विदर्भ हा भरपूर वन संपत्ती असलेला भूभाग असून येथे ताडोबा, मेळघाट सारखे जगप्रसिद्ध अभयारण्य आहे. गडचिरोली भागात घनदाट जंगल असून निसर्गरम्य असे हा संपूर्ण परिसर आहे. या हत्तीमुळे येथील क्षेत्राला पर्यटनदृष्ट्या मोठी उपलब्धी प्राप्त झाली आहे. यामुळे येथे रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. मात्र सरकारने हा निर्णय घेऊन पुन्हा विदर्भावर अन्याय केला आहे.
निर्णय रद्द करण्याकरिता मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र
यासंदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीने राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. सरकार विदर्भावर सर्वच बाबतीत अन्याय करीत असून याचा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. वामनराव चटप, महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, कोर कमिटी सदस्य प्रबीरकुमार चक्रवर्ती, अॅड.मोरेश्वर टेमुर्डे, अरुण केदार, प्रा.पुरुषोत्तम पाटील, धर्मराज रेवतकर, धनंजय धार्मिक, मितीन भागवत, कपिल इद्दे, किशोर दहीकर, सुदाम राठोड, हिराचंद बोरकुटे, रमेश राजूरकर, किशोर पोतनवार, अंकुश वाघमारे, अजय दिकोंडवार, अॅड.चैताली कटलावार, सचिन सरपटवार, प्रमोद डवले, सुधाकर जिवतोडे,राजू बोरकर, अरुण नवले, पराग गुंडेवार यांनी निषेध केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.