- जगाला युद्धाची नाही, बुद्धाच्या शिकवणुकीची गरज - भन्ते महाथेरो
- ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदुर येथे जागतिक धम्म ध्वजदिन समारोह संपन्न
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
जोगाई तथा बुद्ध भूमी विकास व संवर्धन समिती, गडचांदूर च्या वतीने जागतिक धम्म ध्वजदिन समारोह समारंभचे आयोजन ऐतिहासिक बुद्धभूमी येथे शनिवारी करण्यात आले.
याप्रसंगी धम्म ध्वज चे ध्वजारोहण भन्ते पूज्य ज्ञान ज्योती महाथेरो संघाराम गिरी (चिमूर) यांनी केले. त्या नंतर धम्म प्रवरचन झाले. भन्ते ज्ञान ज्योती यांनी सांगितले की, "जगाला युद्ध नको आहे तर बुद्धाच्या सत्य, अहिंसा, शांती, मानवता या शिकवणुकीची आवश्यकता आहे." सर्वांनी बुद्धाच्या शिकवणुकीचे पालन करावे.
सदर कार्यक्रमात भन्ते कश्यप, शांतीज्योती, अग्ग,आणि भिक्षु संघ उपस्थित होते. संवर्धन समिती चे अध्यक्ष दशरथ डांगे, मारोती लोखंडे, प्रकाश भसारकर, प्रभाकर खाडे, चंद्रमनी उमरे, पंचशील युग प्रवर्तक समितीचे अध्यक्ष गौतम भसारकर, प्रा. रोशन मेश्राम, कवडजी सोंडवले, सोमेश्वर सोनकांबळे, माजी पंचायत समितीचे सभापती महेंद्रकुमार ताकसांडे, विश्वास विहिरे, आशील निरंजने, आशाताई सोनडवले, करुणा धोटे, सीमा खैरे, सविता विहिरे, सत्यशीला निरंजने, मायाताई भगत, वनिता भसारकर, रवी ताकसांडे, एकनाथ पाटील, उध्दव दिवे, यांच्यासह गडचांदूर परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम चे संचालन भानुदास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर डोंगरे यांनी केले. याप्रसंगी शाहीर संभाजी ढगे, तुकाराम जाधव, सदानंद टिपले यांचा बुद्ध भीम गीत, प्रबोधन कार्यक्रम झाला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.