- गडचांदूर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : आमदार सुभाष धोटे
- आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते गडचांदूर येथे ३ कोटी ४५ लक्षाच्याविकासकामांचे भूमिपूजन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर येथे वैशिष्ट्यपूर्ण अनुदान अंतर्गत २ कोटी १० लक्ष रुपये, अग्निशामन वाहनसाठी ८३ लक्ष, अग्निशमन सेवा केंद्राच्या इमारतीसाठी ५२ लक्ष अशा एकूण ३ कोटी ४५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने गड्चांदूर येथे उपलब्ध झालेल्या अग्नीशामक वाहनाचे लोकार्पण सुध्दा त्याच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, गडचांदूर शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता पडू देणार नाही. जय संताजी महिला मंडळ गडचांदूर च्या वतीने संताजी जगनाडे महाराज चौक सौंदर्यीकरण व स्मारक उभारण्याकरिता १० लक्ष रुपये निधीची मागणी केली. हा निधी लवकर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. स्थानिक मानिकगढ गेट ते मोक्षधाम पर्यंत मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याकरिता पाठपुरावा करून येथे लवकरच निधी मंजूर करु व गडचांदूर बसस्थानकाकरिता अंबुजा सिमेंट कंपनीची जागा हस्तांतरित करण्यासाठी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बैठक लावली असून तोही प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला. गड्चांदूर स्थित सरकारी गोडावून व इरिगेशन विभागाची जागा नगर परिषदेस हस्तांतरित करण्यासाठी ही आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. वैशिथपूर्णा योजने अंतर्गत 2 कोटी 20 लक्ष रुपयांचा प्रस्ताव शासनास पाठविला असून 2-3 महिन्यात त्याचाही निधी नगर परिषद ला मंजूर होणार असल्याचे आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले. एतीहासिक बौद्ध भूमी ला जाणारा पुल रस्ता व विकास कामांकरिता 1.50 कोटी चा निधी मंजूर केल्या बद्दल पंचशील महिला मंडळ तर्फे आमदार सुभाष धोटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकाम, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण निमजे, नगराध्यक्ष अरुण धोटे, बाळासाहेब मोहितकर, मुख्याधिकारी विशाखा शेडकी, उपनगराध्यक्ष शरद जोगी, गटनेते विक्रम येरणे, सभापती राहुल उमरे, अर्चना वांढरे, कल्पना निमजे, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, जयश्री ताकसांडे, अरविंद मेश्राम, मिनिक्षी ऐकरे,माजी सरपंच शिवकुमार राठी, नामदेव येरणे, बाबा गोरे, अशोक बावणे, उपसरपंच आशिष देरकर, सं गां नि योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, महिला काँगेस अध्यक्ष अर्चना आंबेकर, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष रुपेश चुदरी, माजी ग्रामपंचायत सदस्य अहमद भाई, अतुल गोरे, अनिल निवलकर, केशव डोहे, गणेश आदे, चंद्रमुनी उमरे, तुकाराम चिकटे, अनिल शेंडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.