धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
लायन्स आय सेंटर, सेवाग्राम, वर्धा, लायन्स क्लब ऑफ चंद्रपूर महाकाली, महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर सेंटर, साईबाबा सेवा समिती, व्यापारी असोसिएशन, गडचांदूर, पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साई मंदिर, गडचांदूर येथे 9 जानेवारी ला दुपारी 12 वाजता विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात निवडलेल्या रुग्णावर विनामूल्य कृत्रिम भिंगारोपन मोतीबिंदू शस्त्रक्रिया 10 जानेवारी ला सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेज मध्ये नेत्रतज्ञ च्या हस्ते करण्यात येणार आहे.
शिबिरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड, सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे नेत्रतज्ञ डॉ. शुक्ला, ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर चे वैद्यकीय चिकित्सक डॉ संजय गाठे, नेत्र चिकित्सक डॉ. एस. जी. बुरांडे, लायन्स क्लब, चंद्रपूर महाकाली चे अध्यक्ष श्याम धोपटे, सचिव
अजय वैरागडे, महावीर इंटरनॅशनल चे अध्यक्ष हरीश मुथा, सचिव मनीष खटोड, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे,अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक उपस्थित राहणार आहे.
शिबिरात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांनी आधार कार्ड व रेशनकार्ड ची मूळ प्रत व झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक धनंजय छाजेड, सतिश उपलेंचवार, मनोज भोजेकर, संदीप शेरकी, हंसराज चौधरी, प्रशांत गौरशेट्टीवार, विक्रम येरणे, रवी गेल्डा, विठ्ठल वैद्य,जावेद मिठाणी, हेमतभाऊ वैरागडे, सतीश बेतावार यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.