Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दारू दुकानाला नाहरकत देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कसली होती कम्बर... !!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दारू दुकानाच्या नाहरकत देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कसली होती कम्बर... !! विरोधकांनी उधळून लावले ठराव घेण्याचे डाव  दारू दुकानाच्या समर्थनार्थ ...
  • दारू दुकानाच्या नाहरकत देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कसली होती कम्बर... !!
  • विरोधकांनी उधळून लावले ठराव घेण्याचे डाव 
  • दारू दुकानाच्या समर्थनार्थ 6 तर विरोधात 11 व 1 मत अवैध ठरल्याने दारू दुकानाचा ठराव नामंजूर
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर नगरपरिषदची 9 डिसेंबर 2021 रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. त्यामध्ये इतर विषयांसह 14 वा विषय स्थलांतरित देशी दारू दुकानाचा होता. यावर विचार विनियम करून निर्णय घेतला जाणार होता.मात्र त्यादिवशी कांग्रेसचे दोन नगरसेवक अनुपस्थित असल्याने ठरावाला बहुमत कमी पडेल कदाचित या भितीने 10 विषय घेऊन नगराध्यक्षांनी सदर सभा अचानकपणे तहकुब केल्याचे विरोधी नगरसेवकांचे म्हणणे होते. ती तहकुब सभा नंतर 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली. या   सर्व सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी आवर्जून हजेरी लावली. आज दारूचा विषय सभेला आहे व सत्ताधारी नाहरकत  देणार अशी वाऱ्या सारखी शहरात चर्चा पसरली व असंख्य महिला नगर परिषद समोर उभे राहुन नारे बाजी करीत असल्याने व सभागृहात विरोधी नगरसेवकांनी नाहरकत न देण्याबाबत ठाम भूमिका घेतली. या दरम्यान अनेक घडामोडी घडल्या, तरीपण दारूच्या विषयावर विरोधी नगरसेवकांचा विरोध व आक्रमक भूमिका लक्षात घेत गुप्त मतदान घेण्याचा निर्णय नगराध्यक्ष यांनी घेतला. यामध्ये दारू दुकानाच्या समर्थनार्थ 6 आणि विरोधात 11 व 1 मत अवैध ठरल्याने दारू दुकानाचा ठराव नामंजूर करण्यात आला.
गडचांदुर नगर परिषदेत कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसची सत्ता आहे. यापूर्वी सुद्धा लांजेकर यांच्या स्थलांतरित देशी दारू दुकानासाठी विशेष सभा बोलावण्यात आली आणि विरोधी नगरसेवक व नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर बहुमताने ठराव मंजूर करून ना-हरकत देण्यात आले. मात्र या दुसऱ्या नवीन दुकानाबाबत काही कारणाने सत्ताधाऱ्यांमध्ये वादविवाद व नाराजी होती. त्यामुळे याला ना-हरकत देण्यासाठी पूर्वी पासूनच यांच्यात एकमत नसल्यामुळे 9 डिसेंबरची सभा तहकूब करावी लागली असे विरोधी नगरसेवकांचे म्हणणे आहे. 10 जानेवारी रोजी सभा घेण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले व त्यांनी आपापल्या नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने राहण्यास सांगितल्याची माहिती आहे. असे असताना शेवटी विरोधी नगरसेवकांनी सभेत सदर ठरावाला मंजूर होऊ दिले नाही हे मात्र विशेष. या नवीन दारू दुकानाला विरोध दर्शवण्यासाठी सभेच्या दिवशी संबंधित परिसरातील अनेक महिला स्थानिक नगरपरिषद समोर ठिय्या मांडून बसले होते. ठराव नामंजूर झाल्यानंतर महिलांनी या विषयी समाधान व्यक्त करत दारूच्या विरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांचे आभार मानले आहे. काही का असेना शेवटी या बहुचर्चित विषयाला पूर्णविराम मिळाला असून "विरोध झाला मोठा, पैसा झाला खोटा" अशी उपहासात्मक चर्चा सध्या शहरात ऐकायला मिळत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top