Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा - आ. किशोर जोरगेवार आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक श...
  • कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा - आ. किशोर जोरगेवार
  • आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हि चिंतेची बाब आहे. मात्र कोरोणाच्या दुस-या लाटेत उद्भवलेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये या करिता रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवून आरोग्य व्यवस्था सुसज्ज ठेवा  अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य विभागाला केल्या आहे.
आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाच्या अधिका-याची आढावा बैठक घेतली. या बैठकीला शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अशोक नितनवरे, जिल्हा चल्य चिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड, मायक्रो बायोलाॅजी प्रमूख डाॅ. राजेंद्र सुरपाम आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्हात कोरोनाच्या रुग्णसंख्येने प्रतिदिन वाढ होत आहे. असे असले तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र संभावित उद्भवणा-या संकटाशी सामना करण्यासाठी सतर्क आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असणे गरजेचे आहे. असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. आज आयोजीत बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य विभागाला अनेक महत्वाच्या सुचना केल्या आहेत.
चंद्रपूर मतदार संघातील शासकीय रुग्णालयात ६५० खाटांची व्यवस्था आहे. हि व्यवस्था वाढवून ८०० खाटांपर्यत पोहचवावी अशा सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. तसेच घूग्घूस येथील राजिव रतन रुग्णालयात १०० खाटा वाढवणे सहज शक्य आहे. त्या दिशेनेही आरोग्य विभागाने काम करण्याच्या सुचना आ. जोरगेवार यांनी केल्या आहे. आरटीपीसीआर चाचणीचे काम उत्तम सुरु असल्याचे सांगत त्याचे कौतुकही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top