Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चिमूर तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेची नवीन कार्यकारिणी गठीत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चिमूर तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेची नवीन कार्यकारिणी गठीत अध्यक्षपदी निसार शेख तर सचिवपदी मनोज सोगलकर यांची सर्वानुमते निवड मनोज सोगलकर -...

  • चिमूर तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेची नवीन कार्यकारिणी गठीत
  • अध्यक्षपदी निसार शेख तर सचिवपदी मनोज सोगलकर यांची सर्वानुमते निवड
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चिमूर -
चिमूर तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनाच्या झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात निसार शेख अध्यक्ष, चरणदास वाघ उपाध्यक्ष, मनोज सोगलकर सचिव, पृथ्वीराज डांगे कोषाध्यक्ष, वासुदेव रासेकर सहसचिव व सदस्य पदी बंडू मुरकुटे, रवींद्र श्रीरामे, महादेव गजघाटे, फागो खेडकर, श्रावण सुकारे, कैलास खोब्रागडे, राजेंद्र हनवते, संजय गोरले, विलास रामटेके, गणेश कुंभरे इत्यादीची कार्यकारिणीतील सदस्य म्हणून निवड करण्यात आली. प्रसिद्धी प्रमुख पदी चेतन गायकवाड, विनेश ढोक, बंडू मुरकुटे तर सल्लागार प्रमुखपदी देविदास दैवले, अविनाश वाघमारे इत्यादीची कार्यकारिणीत निवड करण्यात आली. बैठकीत तालुक्यातील बहुतांश रोजगार सेवक उपस्थित होते. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top