Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बाळाला विकल्याची धक्कादायक घटना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बाळाला विकल्याची धक्कादायक घटना नवजात बालकेही सुरक्षित नाहीत बाळाला विकणारी टोळी अटकेत आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - एचआयव्ही झा...

  • बाळाला विकल्याची धक्कादायक घटना
  • नवजात बालकेही सुरक्षित नाहीत
  • बाळाला विकणारी टोळी अटकेत
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
एचआयव्ही झाल्याची भीती दाखवून दहा दिवसाच्या बाळाला संस्थेच्या सूपुर्त करण्याचा बहाण्याने 2 लाख 75 हजारांना बाळाला विकल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केलीय. या घटनेने चंद्रपूरात लहान बालकेही सुरक्षित नसल्याचं समोर आलंय.
चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात 13 जानेवारीला पीडित महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. घराशेजारी राहणारी मिना राजु चौधरी ही महिला तिला भेटायला वारंवार रुग्णालयात जायची. सुट्टी झाल्यावर पीडित महिलेला मिना चौधरी हिने घरी न नेता लोहारा येथील लोटस हॉटेल येथे घेऊन गेली. तुला HIV झाला आहे. तू बाळाला सोबत ठेवले तर बाळ सुध्दा बाधित होईल, अशी भीती दाखविली. बाळाला सुरक्षित ठेवायचे असल्यास नागपूर येथील माझ्या ओळखीच्या संस्थेकडे बाळाला सूपुर्त करु. काही दिवस ते बाळाचा सांभाळ करतील, असं शेजारणीने पीडितेला सांगितलं.
भीतीपोटी पीडितेने आपल्या बाळाला नागपूरमधून आलेल्या तीन महिलांच्या स्वाधिन केले. 18 जानेवारीला मीना चौधरी ही पिडीत महिलेच्या घरी गेली. तिने पीडितेला 49 हजार रूपये दिले. आपलेच बाळ सांभाळण्याचे आपल्यालाच पैसे कसे मिळतील? अशी शंका तीला आली. बाळाला भेटण्याचा तिने आग्रह धरला. मात्र मिना चौधरीकडून तिला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे पीडितेला शंका आली.
पिडीत महिलेने अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. घडलेला घटनाक्रम सांगितला. रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी मीना चौधरी हिला ताब्यात घेतले. चौकशीत धक्कादायक प्रकार पुढे आला.
मीना चौधरी हिने प्रियकर जाबिर रफिक शेख व उर्जुग सलीम सय्यद याच्या मदतीने नागपुरातील वनिता कावडे, पुजा शाहु, शालिनी मोडक यांना 2 लाख 75 हजार रुपयात बाळ विकल्याची कबुली दिली. नागपुरातील वनिता कावडे, पुजा शाहु, शालिनी मोडक यांना ताब्यात घेत नवजात बाळाची चौकशी पोलीसांनी केली.
चंद्रपूर येथील स्मिता मानकर या महिलेकडे बाळ ठेवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले आहे. बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आता मीना चौधरी, जाबिर रफिक शेख, अजुम सलीम सय्यद, वनिता मुलचंद कावडे, पुजा सुरेंद्र शाहु, शालिनी गोपाल मोडक यांना अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top