Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अकरा महिन्यात एकूण 350 दुचाकीचे अपघात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अकरा महिन्यात एकूण 350 दुचाकीचे अपघात विनाहेल्मेट 197 दुचाकीस्वारांचा मृत्यू विनाहेल्मेट आढळल्यास दंडात्मक कारवाई जिल्ह्यात आजपासून हेल्मेटस...

  • अकरा महिन्यात एकूण 350 दुचाकीचे अपघात
  • विनाहेल्मेट 197 दुचाकीस्वारांचा मृत्यू
  • विनाहेल्मेट आढळल्यास दंडात्मक कारवाई
  • जिल्ह्यात आजपासून हेल्मेटसक्ती
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील दुचाकी वाहनचालकांच्या अपघाताचे प्रमाण कमी करणे व त्यावर प्रभावी उपाययोजना म्हणून आज सोमवारपासून हेल्मेट वापरणे आवश्यक करण्यात आले आहे. मात्र वाहनचालक विनाहेल्मेट आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत आहे. अपघातात बळी पडलेल्या अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते, असे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2021 पर्यंत दुचाकीचे एकूण 350 अपघात झाले. त्यात 197 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 144 दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे मोटार वाहन कायद्यान्वये सक्तीचे आहे. मात्र, याकडे दुचाकीचालक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाच्या वतीने हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर 17 जानेवारीपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

टप्याटप्याने होणार कारवाई
सर्वप्रथम पोलिस विभागातील पोलिस अधिकारी व कर्मचारी, त्यानंतर इतर विभागातील सरकारी अधिकारी व कर्मचारी आणि मग सामान्य जनता, अशी टप्प्याटप्प्याने कारवाई होणार आहे. 17 जानेवारीपासून चंद्रपुरात हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे.

विनाहेल्मेट 197 दुचाकीस्वारांचा मृत्यू
मागील वर्षभरात अपघातांमध्ये विनाहेल्मेट असणाऱ्या 197 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. हेल्मेटबाबत जनजागृती करूनही दुचाकीस्वार याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हेल्मेट सक्ती करण्यात आली असून नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन चंद्रपूरचे वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top