- आदिवासी तरुणांच्या भविष्याची चिंतन करण्याची गरज
- आदिवासी संघर्ष कृती समिती शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासोबत चर्चा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे झालेल्या आदिवासी संघर्ष कृती समिती चंद्रपूर द्वारा जिल्हाधिकारी अजय गूल्हाने यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत विविध सामजिक समस्या संदर्भात समितीचे पदाधिकारी आपापल्या सविस्तर मत व्यक्त करण्यात आले.
महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभागाचे, शासन निर्णय क्रमांक. बीसीसी२०१८/प्र.क्र.३०८/१६-ब दिनांक २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये दिनांक ३१/१२/२०१९ पर्यत आदिवासी बेरोजगारांची १२५०० पदांची विशेष पदभरती मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयानी संदभिर्य शासन निर्णयानुसार गैर आदिवासीना अधिसंख्य पदावर वर्ग केले नाही तसेच अनु.जमातीच्या प्रवर्गाची पदे भरण्यात आलेली नाही.
मूळ आदिवासींना त्यांच्या संविधानिक हक्क व अधिकारापासून वंचित ठेवल्या जात आहे. अशी आदिवासी समाजाची व तरुणांची भावना झालेली आहे.
२१ डिसेंबर २०१९ शासन निर्णय नुसार चंद्रपुर मधील बहुतांश कार्यालयामध्ये गैर आदिवासीची पदे अधिसंख्य पदावर वर्ग केले नाही. तसेच अनु.जमतीचे प्रवर्गाची पदे भरण्यात आलेली नाही. तेव्हा जिल्हाधिकारी आपल्या स्तरावर जिल्ह्यातील कार्यालयाकडून अहवाल मागवून शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात आदेशीत करण्यात यावे. व आदिवासी युवकांची विशेष पदभरती तात्काळ घेण्यात यावी. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कार्यालयातील अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र प्रमाणपत्र प्रकरण जात पडताळणी समित्यांकडे प्रलंबित आहेत त्यासाठी विभागप्रमुखांकडून वारंवार विचारणा करणे आवश्यक असते परंतु एकदा प्रस्ताव पाठवल्यानंतर विभाग प्रमुख या कडे दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे अनेक गैआदिवासीचे वैधता प्रमाणपत्र नियोजित कालावधीमध्ये कार्यालयात येत नाही .यासाठी आपल्या स्तरावरून विभाग प्रमुखांना अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीकडे वारंवार पाठपुरावा करून संबंधित कर्मचाऱ्यांचे जात पडताळणी समितीच्या संदर्भामध्ये आढावा घेण्यात यावा व सदर कार्यालयातील प्रलंबित प्रकरणाचा अहवाल मागवावा यासाठी आदेशित करावे.
तसेच ०९ ऑगस्ट,२१ऑक्टोबर, १५ नोव्हेंबर या एकदिवसाची जिल्हाधिकारी यांचे अधिकारातील सुट्टी जाहीर करावी. चंद्रपुरमध्ये आदिवासी समाजाची समाजभवनकरिता जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मक भुमिकेतून विचार करावा असे विजय कुमरे जिल्हाध्यक्ष आर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल (ऑफ्रोट), चंद्रपूर यांनी केली.
वनजमिनिवर पिढ्यानापिढ्या उपजीविकेकरीता शेती करिता असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना अनुसूचित जमातीचे वन पट्टे व सातबारा देण्यात यावे, शेत जमित गैरआदिवासी कडून परतकरण्या संदर्भात सविस्तर माहिती सादर करत विजयसिंह मडावी अध्यक्ष, आदिवासी संघर्ष कृती समिती चंद्रपूर यांनी चर्चा केली.
आजच्या स्पधेंच्या युगात अनेक MPSC स्पर्धेत काळाबाजार चालू आहे.या काळाबाजार मध्ये सामान्य,गोरगरीब विद्यार्थी खरच टिकू शकेल का ? आदिवासी तरुणांचा भविष्याच्या विचार करण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना,राजुरा या तालुक्यातिल काही गाव पेसा क्षेत्रात मोडत असून अनेक सुशिक्षित बेरोजगार आदिवासी विद्यार्थी प्रत्येक गावात आहेत. पेसा क्षेत्र असूनही या आदिवासी तरुण (युवक) विद्यार्थी यांना कोणत्याही कुठल्याही प्रकारचा रोजगार व नोकरीची संधी उपलब्ध नाही मग पेसा क्षेत्रा असून देखिल काय फायदा समाजाचा दिशाभूल करण्याचा कायदा असे चित्र दिसत आहे.या पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लक्ष देऊन पेसा क्षेत्रातील पदभरती करण्याची विनंती करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीची ५०% लोकसंख्या असलेल्या गावाचा सामावेश पेसा क्षेत्रात समावेश करण्यात यावा. असे सविस्तर मत कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघ चंद्रपूर यांनी व्यक्त केले.
रखडलेली आदिवासी बेरोजगारांची १२५०० पदांची विशेष पदभरती न्यायालयीन आदेश प्रमाणे राबविणे बाबत व इतर मागण्यासह मा.जिल्हाधिकारी साहेब यांचा सोबत चर्चा करण्यात आली यावेळी मा.जिल्हाधिकारी साहेब शिष्टमंडळाचे सविस्तर चर्चा नंतर मा.जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले.
त्यांनतर जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाला भेट दिल्याबद्दल आदिवासी संघर्ष कृती समिती तर्फे जितेश कुळमेथे यांनी आभार मानले आहे.
आदिवासी संघर्ष कृती समिती, चंद्रपूर द्वारा दिनांक 7 जानेवारी 2022 ला आदिवासी समाजाच्या विविध समस्या घेऊन विशाल मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले होते .परंतु दिनांक 5 जानेवारी 2022 ला माननीय जिल्हाधिकारी, माननीय उपविभागीय अधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक यांनी मोर्चा न काढण्याबाबत आदिवासी संघर्ष कृती समितीला केलेली विनंती मान्य करून दिनांक 7 जानेवारी 2022 ला चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या समस्या लेखी स्वरूपात देऊन शिष्टमंडळासोबत मुद्देनिहाय चर्चा करण्यात आली. व त्या समस्या नियोजित कालावधीत यथाशिघ्र समस्या सोडविल्या जातील असे आश्वासन देण्यात आले. यापुढे आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून आपणही प्रशासनाला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
आदिवासी संघर्ष कृती समितीने दिलेल्या निवेदनाचा निवेदनातील मागण्यांची पूर्तता पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने करावी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे. असे आदिवासी संघर्ष कृती समिती द्वारा सांगण्यात आले.
आदिवासी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाला मध्ये कृती समितीचे अध्यक्ष विजयसिंह मडावी, आ.सं.कृ. समितीचे सचिव जितेश कुळमेथे, कोषाध्यक्ष कृष्णाजी मसराम, सल्लागार नामदेव शेडमाके, विद्यार्थी प्रतिनिधी कंटू कोटनाके, समन्वयक मारोती जुमनाके, अनिल सूरपाम, आनंदराव कोटनाके, संकेत कुळमेथे इत्यादी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.