- आदिवासी बांधवानी आपल्या मूला मुलींच्या शिक्षणासाठी भर द्यावा - सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे आवाहन
- आरोग्य निदान शिबिर व गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना सुमारे तीन लाखांचे साहित्य वाटप
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
आदिवासी, दुर्गम व डोंगराळ जिवती तालुक्यातील माथाडी येथे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय चंद्रपूर, विट्ठल रुख्मिनी देवस्थान गडचांदूर, व्यंकटेश बहू उद्देशीय संस्था द्वारा संचालित विदर्भ महाविद्यालय जिवती, भागवत हेरिटेज सर्विस फौंडेशन चंद्रपूर, जलाराम सेवा मंडळ चंद्रपूर, माता विहार नर्सिंग होम शेणगाव, स्वर्गीय भगीरथ बजाज सेवा प्रतिष्टान चंद्रपूर, संकल्प ग्रामविकास बहू उद्देशीय संस्था चंद्रपुर, सोनादेवी बहू उद्देशीय संस्था चंद्रपूर, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड सिमेंट वर्क्स गडचांदूर युनिट, महाकाली मंदिर चंद्रपूर यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व सामाजिक संस्थेच्या वतीने आरोग्य निदान शिबिर व गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना सुमारे तीन लाखांचे साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक धर्मादाय आयुक्त चंद्रपूर श्रीमती सी.एस. ढबाळे या लाभल्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भागवताचार्य मनीषभाई महाराज, दिपक महाराज पुरी, मनिष भाई सूचक, श्रीमती ममता बजाज, सौ देशकर, पाठक, माणिकगड सिमेंट कंपनी चे प्रतिनिधी योगेश्वर चहारे, येरपुढे सर, डॉ अभिलाषा गावतुरे, रोशन आकुलवर, डॉ. रोहित निखाडे, डॉ प्रसाद वैद्य, डॉ दिपक जोगदंड, डॉ आकाश तुराळे, सिस्टर अँजेल, सिस्टर जॉईसी, फादर सोमी वर्गीस, अशोक शिंदे, राकेश आमटे, रोहित ठाकूर, प्रवीण निखारे, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक आर.ए. मडावी, आर.आर. उपासे, सरपंच जालीमशहा सोयाम, पोलीस पाटील व्यंकटी थाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे आदिवासी बांधवांनी वाजत गाजत नृत्यासह भव्य स्वागत केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्या नंतर भागवताचार्य मनिष महाराज, दिपक महाराज पुरी, डॉ. अभिलाषा गावतुरे, सौ. ममता बजाज यांनी उपस्थित जनतेला अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य विषयक समयोचित मार्गदर्शन केले. सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी अशा कार्यक्रम च्या माध्यमातून समाज सेवा करण्यासाठी पुढाकार घेऊन सामाजिक ऋण फेडावे. आदिवासी बांधवानी आपल्या मूला मुलींच्या शिक्षणासाठी भर द्यावा, असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणातून सहाय्यक धर्मादाय आयुक्त ढबाळे मॅडम यांनी केले. त्या नंतर लाभार्थ्यांना सुमारे तीन लाखांचे मोफत अन्नधान्य, ब्लॅंकेट, साडी, धोतर, स्कूल बॅग, शाल, दुप्पटे, ब्लॉउज पीस, मास्क इत्यादी चे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी महाकाली मंदिराचे वतीने महिलांना साड्या देण्यात आल्या.
सहाय्यक धर्मादाय आयुक्त चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा सि. एस. सी, वि. एल. ई. को. ऑप सोसायटी चे सचिव तथा पत्रकार उद्धव पुरी, व्यंकटेश बहुउद्देशीय संस्थेचे संचालक नानासाहेब देशमुख, विठ्ठल पुरी, वैद्यकीय चमूने, सहभागी संस्थेचे कार्यकर्ते, स्थानिक युवकांनी आरोग्य शिबीर व वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम व सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार आपले सरकार सेवा केंद्र चे संचालक व पत्रकार रवी तेलंग यांनी मानले. परिसरातील गोर गरीब, आदिवासी कोलाम, बंजारा समाजातील सुमारे तीनशे महिला पुरुष व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेतला. सदर कार्यक्रम कोरोनाचे नियमावलीचे पालन करून आयोजित करण्यात आला होता.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.