Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खेळ जिवणात यशस्वी होण्यास मददगार - चंदनसिंह चंदेल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खेळ जिवणात यशस्वी होण्यास मददगार - चंदनसिंह चंदेल एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - तरुण उत्साही क्रिडा व बहुउद्देशिय...
  • खेळ जिवणात यशस्वी होण्यास मददगार - चंदनसिंह चंदेल
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
तरुण उत्साही क्रिडा व बहुउद्देशिय मंडळ बल्लारपूर व हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनियर कबड्डी निवड चाचणी व प्रतियोगिता स्पर्धा दि. १३ व १४ डिसेंबर ला आयोजित करण्यात आली होती. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ चे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, प्रमुख पाहुणे म्हणून हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर चे सचिव दिलीप रामिडवार, भाजपा अल्पसंख्यक आघाडी जिल्हाध्यक्ष शेख जुम्मन रिझवी, भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह, नगरसेविका सौ सुवर्णा भटारकर, सौ. जयश्री मोहूर्ले, श्रीराम सेना महासंघ बल्लारपूर अध्यक्ष बीरेंद्र श्रीवास, बल्लारपूर तालुका क्रिडा संयोजक किशोर मोहूर्ले, माजी नगरसेवक विकास दूपारे, भाजपा जिल्हा प्रसिद्धी सहसंयोजक आशिष चावडा, भाजपा युवा नेतृत्व विशांकसिंह ठाकुर, भाजपा नेता अरूण भटारकर, भाजपा महिला नेतृत्व बोम्मावार ताई उपस्थित होते. 
या स्पर्धेत ज्युनियर पुरुष गटात एकूण ३६ संघाने सहभाग घेतला. या कबड्डी सामनेत पुरूषा मधुन श्री विठ्ठल व्यायाम शाळा चंद्रपूर हा विजयी संघ व श्री गुरुदेव क्रिडा मंडळ गोवरी उप विजेता संघ व महिला कबड्डी सामनेत जय हिंद क्रिडा मंडळ नागरी विजयी संघ तसेच आदर्श क्रिडा मंडळ चंद्रपूर यांना उपविजेता संघ घोषित करण्यात आले. सर्व विजयी संघांना मा.चंदन सिंह चंदेल व उपस्थित मान्यवरां हस्ते ट्रॉफी व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कबड्डी सामनेत यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आदरणीय बाबुजी व मान्यवरांनी श्री तरुण उत्साही क्रिडा मंडळ बल्लारपूर यांचा कौतुक करून भविष्यात  असेच उपक्रम व क्रिडा उत्सव चालु आयोजनास शुभेच्छा देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन भाजपा शहर सचिव व बेरोजगार अभियंता असोसिएशन चंद्रपूर चे अध्यक्ष इंजि. देवेंद्र वाटकर व आभार प्रदर्शन किशोर मोहूर्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजन व यशस्वी करण्यास तरुण उत्साही क्रिडा मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष प्रदीप कोकोडे, साई मित्र परिवार चे अध्यक्ष राहुल कोत्तावार, कार्तिक रामटेके, उपाध्यक्ष वेणू एंनगंदलावार, नियोजन समितीचे अध्यक्ष भास्कर मुळे, उपाध्यक्ष नयन बोम्मावार, सचिव आशिष नन्नावरे, कोषाध्यक्ष अश्विन वरखडे मंडळाचे सदस्य प्रिझम वाढई,विश्वास कंन्नाके, नयन, प्रथम मोहुरले, रेवन शास्त्रकार,भूषण पस्पुलकर, प्रथमेश भटारकर,आकाश सातपुते, साहिल दासरवार, संदीप चौधरी पारस लेनगुरे व मित्र मंडळीचा समावेश होता.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top