Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शालेय मुलींनी मोबाइलचा गैरवापर करू नये - पोलीस निरीक्षक सत्यजित आमले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शालेय मुलींनी मोबाइल चा गैरवापर करू नये - पोलीस निरीक्षक सत्यजित आमले धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - महात्मा गांधी विद्...
  • शालेय मुलींनी मोबाइल चा गैरवापर करू नये - पोलीस निरीक्षक सत्यजित आमले
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे पोलीस स्टेशन गडचांदूरच्या वतीने 16 डिसेंबर ला पोलीस काका व पोलीस दीदी उपक्रम 2021 अंतर्गत शाळा व महाविद्यालयातील मुले मुलींकरिता कायदा व सुव्यवस्था या विषयावर ठाणेदार सत्यजित आमले महिला पोलीस उप निरीक्षक निशा खोबरागडे व सुषमा अडकिने यांनी सखोल मार्गदर्शन केले. 
पोलिस निरीक्षक सत्यजित आमले यांनी शालेय मुलींना मार्गदर्शन करताना मोबाईल चा गैरवापर न करण्याचा सल्ला दिला, पुस्तकावर जिवापाड प्रेम करून अभ्यास करून जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत घ्यावी असे सांगितले, मुलींनी अनोळखी युवकांसोबत जाऊ नये,जास्त बोलू नये, संगत चांगली असावी, एखादा युवक त्रास देत असेल तर तात्काळ पोलीस दीदी ला सांगावे,अशा अनेक सूचना केल्या. निशा खोब्रागडे, व सुषमा आडकीने यांनी मुलींना मार्गदर्शन केले व सावध राहण्याचा सल्ला दिला. 
याप्रसंगी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ, स्मिता चिताडे, उपप्राचार्य विजय आकनूरवार, एमसीव्हीसी विभागाचे प्रमुख प्रा. अशोक डोईफोडे, प्रा. नंदाताई भोयर, प्राशीष देरकर, प्रा.प्रदीप परसुटकर, प्रा.प्रशांत पवार उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन देरकर यांनी केले. याप्रसंगी शालेय व महाविद्यालया तील मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top