Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूरात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूरात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती गडच...
  • गडचांदूरात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती गडचांदूर येथे वंजारी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित एका  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या माजी सभापती सौ. गोदावरीताई केंद्रे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सुरेश केंद्रे, प्रा. अशोक डोईफोडे, डॉ. माधवराव केंद्रे, अंगद केंद्रे, रामदास बढे, निवृत्ती नागरगोजे, सौ. नलिनी केंद्रे, सौ. प्रभा डोईफोडे होत्या. सर्वप्रथम उपस्थित अतिथी व समाजबांधवाणी संत भगवानबाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
सुरेश केंद्रे यांनी आपल्या भाषणातुन गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला, वंजारी समाजाच्या तसेच इतर समाजाच्या  उन्नतीसाठी गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण जीवन अर्पण केले, वंजारी समाज आज सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर आहेत ते केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या मूळे च असल्याचे सांगितले, प्रा, अशोक डोईफोडे यांनी आपल्या मनोगतात वंजारी समाजाला आरक्षण गोपीनाथ मुंडे यांनी मिळवून दिल्या मुळे आज सर्व क्षेत्रात समाज प्रगतीपथावर असल्याचे सांगितले, रामदास बढे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले,प्रास्ताविक धनंजय घुले यांनी केले,,संचालन काकासाहेब नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृष्णा गर्जे यांनी केले. याप्रसंगी सौ, राजश्री घुगे, लक्ष्मण मिसाळ, धर्मराज मुंढे,विष्णू बढे,महादेव कायंदे, भगवान नागरगोजे, धनंजय वाघ,सिद्धेश्वर लटपटे, गजानन तिडके, निळकंठ केंद्रे, बालाजी कागणे, संजय केंद्रे तथा इतर सहपरिवार उपस्थित होते. 
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वंजारी समाजाच्या वतीने स्थानिक जिजामाता बालसुधारगृहात वॉर्डन वैशाली मडावी यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनी ना सॅनिटायझर, मास्क व सॅनिटरी पॅड तसेच मिठाई चे वाटप करण्यात आले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top