Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर येथे हनुमान मंदिरात श्री प्रभू रामचंद्र मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर येथे हनुमान मंदिरात श्री प्रभू रामचंद्र मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम 25 ते 27 डिसेंबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन धनराजसि...
  • गडचांदूर येथे हनुमान मंदिरात श्री प्रभू रामचंद्र मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम
  • 25 ते 27 डिसेंबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
शहरातील हनुमान मंदिरात श्री गणेश व मर्यादापुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती ची प्राणप्रतिष्ठापना 27 डिसेंबर ला करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने 25 डिसेंबर ते 27  डिसेंबर पावेतो विविध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे. सर्व मुर्ती ची प्राणप्रतिष्ठापणा ब्रह्मर्शी रामेश्वर,  आचार्य वनोजुला, नरेश शर्मा वनोजुहोईल , श्रीधर आचार्य पंडित यांच्या शुभहस्ते होईल. 25 डिसेंबर ला पहाटे 5 वाजता काकडआरती, त्या नंतर गणपती पूजन, गोमातापूजन, ब्रह्महहोईल स्थापना, मूर्ती चे पंचामृत अभिषेक, भजन कार्यक्रम होईल.  26 डिसेंबरला काकड आरती , श्रीराम प्रभूची पालकी शोभायात्रा, धान्यव फख शह्यांद्रवास,भजन होईल. 27 डिसेंबर ला काकडआरती, यंत्रस्थापणा , मूर्ती स्थापना, हवन व त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन हनुमान मंदिर देवस्थान तथा  गडचांदूर नगरवासी नी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top