Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ब्रेकिंग न्यूज - वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात धक्कादायक घटना व्याघ्रगणनेची तयारी सुरू असताना झाला हल्ला कोलारा गेट प...












  • वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार
  • ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात धक्कादायक घटना
  • व्याघ्रगणनेची तयारी सुरू असताना झाला हल्ला
  • कोलारा गेट परिसरात वाघिणीनं केलेल्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू
विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स 
चंद्रपूर -
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा वनपरिक्षेत्रात एका वाघिणीने केलेल्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घटना घडली असल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.
स्वाती ढुमने वय ४३ असे त्या महिला वनरक्षकचे नाव आहे. ताडोबा प्रकल्पात सध्या व्याघ्र गणनेची कामे सुरू आहेत. त्याच अंतर्गत शनिवारी सकाळी कोलारा गेट येथे कोअर झोन ९७ मध्ये ट्राझेक्ट लाइन टाकण्याचे काम सुरू होते. वनरक्षक स्वाती ढुमने या देखील कामाच्या पूर्वतयारीसाठी तिथं गेल्या होत्या. त्याचवेळी माया नावाच्या वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला. सोबत असलेल्या चार वनमजुरांनी वाघाला हुसकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघाने स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ताडोबा व्यवस्थापनाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने रवाना झाले व शोधमोहीम राबवली गेली. अखेर शोधमोहिमेत मृतदेह सापडला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top