Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्ट्राटेक फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्ट्राटेक फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद १७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदू...












  • अल्ट्राटेक फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • १७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन यांच्या वतीने व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले. शिबिराचे उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी विदयुत वरखेडकर त्यांचे हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सम्पत खलाटे, कोरपना तहसीलदार महेंद्र वाकलेकर, अल्ट्राटेक  युनिट हेड श्रीराम पी.एस., महाव्यवस्थापक संजय शर्मा, संदीप देशमुख, सौदीप घोष, कर्नल दीपक डे उपस्थित होते. पाहुण्यांचा श्रीफळ व बांबूपासून बनविलेल्या शोभेच्या वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. पाहुण्याच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. 
रक्तदान शिबिरास्थळी सभोवतालच्या गावातील बचत गटाच्या महिलांनी आपल्या हातांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी क्रिष्णा महिला बचत गट सांगोडा, धनलक्ष्मी महिला बचत गट बिबी, जीजाऊ महिला बचत गट नांदा, समृद्धी महिला बचत गट आवारपूर, ऊन्नती महिला बचत गट नोकारी व बांबू हस्तकला बीबी असे सहा महिला बचत गट उपस्थित होते. तसेच अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन ने मागील वर्षात केलेल्या कार्याचा तपशील ब्यानर द्वारा प्रदर्शनीत करण्यात आला होता. शेवटच्या टप्प्यात मुख्य अतिथी अप्पर जिल्हाधिकारी, विदयुत वरखेडकर मॅडम व युनिट हेड, श्रीराम पी.एस. यांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि ते प्रत्येकाने करायला हवे, रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासायला हवी असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी विदयुत वरखेडकर यांनी व्यक्त केले. त्यांनी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कर्नल दिपक डे, सतीश मिश्रा, सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांचे सहकार्य लाभले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top