Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मौलाना आझाद वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मौलाना आझाद वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - मौलाना आझाद वार्ड, राजुरा येथे नगराध्यक्ष अरु...












  • मौलाना आझाद वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
मौलाना आझाद वार्ड, राजुरा येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात अध्यक्षपदी समीना मतिन कुरेशी यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्य यांच्या नावांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. 
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका संध्या चांदेकर, मतीन कुरेशी, निसार बेग, जया विनोद आरमुलवार, मुबाशीरा कुरेशी, निकीशा काझी, अनिता पुटलवार, कल्पना मडावी, मिराबाई आगलावे, रेहाना शेख, बिलकिंस बानो, सिदाबानो शेख, शालु आरमुलवार, शांताबाई आसमपल्लीवार, ललिता इंपावार, आर्शीया कुरेशी, नझीया कुरेशी, कौशर कबीर कुरेशी यासह मौलाना आझाद वार्ड येथील अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top