- आ. सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांना यश
राजुरा -
मध्य चांदा वन विभाग राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत तेंदूपत्ता मजूरांना महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त तेंदूपत्ता बोनस चे वितरण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना आणि अन्य काही तांत्रिक कारणांमुळे तेंदूपत्ता मजूरांचे बोनस वाटप रखडले होते. आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला मात्र थोडा उशीर झाला. तेंदूपत्ता मजूर आणि काही संघटनांनी हा प्रश्न आमदार सुभाष धोटे आणि शासनाकडे परत लावून धरला होता. आमदार धोटे यांनी मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडे पून्हा पून्हा ही मागणी लावून धरली आणि अखेर महाराष्ट्र शासनाने या लाभार्थींसाठी निधी मंजूर केला. यात राजुरा, विहिरगाव आणि खांबाळा या वनपरिक्षेत्रातील सन २०१९ ची तेंदूपत्ता बोनस लाभार्थ्यांची एकूण संख्या २, १६६ एवढी असून २९, ८१, ६८२ रूपये बोनस वाटपाचे नियोजन आहे. आज संतोषी मोहुर्ले - ९७० रूपये, बयनाबाई सुरकर - १०७६ , ज्योती रागीट - १५७१, सुरेश धोंगे - १३४६, सिंधु वडस्कर- १२३३, सुनंदा येलमुले-१८३२, सुरेश कुईटे- १६९१, प्रभाकर शेरकी- ३०९०, भालचंद्र वाघमारे - २६१३ रूपये या प्रमाणे एकूण ९ मजुरांना तेंदूपत्ता बोनस धनादेशाचे वितरण करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.