Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर पोस्ट ऑफिसमध्ये केवळ पोस्टमास्तर कार्यरत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ग्राहकांचे हाल, पार्सल ची कामे ठप्प संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी  गडचांदूर - पोस्ट ऑफ...
  • ग्राहकांचे हाल, पार्सल ची कामे ठप्प
  • संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी

धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
गडचांदूर -
पोस्ट ऑफिस गडचांदूर मध्ये केवळ पोस्टमास्तर कार्यरत असल्याने ग्राहकांना अतोनात त्रास होत आहेत. संपूर्ण पोस्टाचा डोलारा त्यांच्यावर असल्याने पोस्टात येणाऱ्या ग्राहकांची कामे खोळंबली आहे. पोस्टात केवळ पैसे जमा करणे व पैसे परत करणे एवढीच कामे होत आहे, पार्सल करणाऱ्या ग्राहकांना परत करण्यात येत आहे. पोस्ट ऑफिस मध्ये असणारी रिक्त पदे न भरल्या ने तसेच कर्मचारी सुट्टी वर असल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे पोस्टमास्तर यांनी सांगितले.
चंद्रपूर येथील मुख्य पोस्ट ऑफिस मधील वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांचेशी संपर्क साधला असता त्यांना रिक्त पदे न भरली असल्याने व दीपावली निमित्ताने कर्मचारी सुट्टी वर गेल्याने ग्राहकांना त्रास होत असल्याचे सांगितले.
पोस्ट ऑफिस मध्ये कर्मचारी जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत पार्सल ची कामे होणार नाहीत असे सांगून ग्राहकांना परत पाठवल्यामुडे ग्राहकांना विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी ग्राहकांची मागणी आहे.







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top