Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नुकसान भरपाई अभावी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भाजपा च्या वतीने तहसील कार्यालय कोरपना येथे २ नोव्हेंबरला धरणे व निषेध आंदोलन महाराष्ट्रातील मुक्या आंधळी, बहिरी सरकारला जागविण्यासाठी एक दि...
  • भाजपा च्या वतीने तहसील कार्यालय कोरपना येथे २ नोव्हेंबरला धरणे व निषेध आंदोलन
  • महाराष्ट्रातील मुक्या आंधळी, बहिरी सरकारला जागविण्यासाठी एक दिवा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी
धनराजसिंह शेखावत -आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय कोरपना येथे २ नोव्हेंबरला मंगळवारला दुपारी 12:30 वाजता धरणे व निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रद्रोही महाविकास आघाडी सरकारने मायबाप शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईअध्याप न दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांवर यंदाची दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. या मुक्या आंधळी व बहिरी तिघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या  वतीने कोरपना बसस्टॉप, शिवाजी चौक ते तहसील कार्यालय कोरपना पर्यंत रॅली काढून तहसील कार्यालय कोरपना येथे २ नोव्हेंबरला धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा मोर्चा पदाधिकारी व इतर आघाड्यांनी कोरपना तहसील कार्यालयासमोर उपस्थित राहून आंदोलनात सहभागी होण्याची विनंती कोरपना भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा नारायण हिवरकर यांनी केली आहे.





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top