Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नांदाफाटा येथे २० लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदाफाटा येथे २० लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप निहाल जनसेवा केंद्राने केले विशेष प्रयास धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदू...











  • नांदाफाटा येथे २० लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप
  • निहाल जनसेवा केंद्राने केले विशेष प्रयास
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत २० लाभार्थी महिलांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. नांदा फाटा येथे नुकतेच २ महिन्या पूर्वी सुरु झालेल्या निहाल जनसेवा केंद्र नांदाफाटा तर्फे महिलांना उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन वितरण कार्यक्रम  आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्राचार्य अनिल मुसळे, पं.स. सदस्या सविता काळे, बिबीचे माजी सरपंच संतोषकुमार पावडे, रत्नाकर चटप, प्रमोद वाघाडे, रवी बंडीवार आदी उपस्थित होते. निहाल गैस केंद्राचे संचालक हबीब शेख यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. पहिल्या टप्प्यात नांदाफाटा, बिबी, सांगोडा परिसरातील महिलांना उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले. गॅस वापरताना घ्यावयाची काळजी व वापराचे फायदे याबाबत लाभार्थी महिलांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. चंद्रपूरच्या पुष्पराज गॅस एजन्सीने यासाठी सहकार्य केले. शासकीय योजना अंमलबजावणीसाठी निहाल गॅस केंद्र नेहमी तत्पर असेल असे हबीब शेख यांनी मत व्यक्त केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top