Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अबब! म्हैस दूध काढू देत नाही म्हणत शेतकऱ्याने केली पोलीस ठाण्यात तक्रार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अबब! म्हैस दूध काढू देत नाही म्हणत शेतकऱ्याने केली पोलीस ठाण्यात तक्रार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स भिंड - मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात...
















  • अबब! म्हैस दूध काढू देत नाही म्हणत शेतकऱ्याने केली पोलीस ठाण्यात तक्रार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
भिंड -
मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात पोलिसांसमोर एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. हे पाहून भिंड पोलीसही हैराण झाले. पण भिंड पोलिसांनी या प्रकरणाची उकल रंजक पद्धतीने केली. भिंड जिल्ह्यातील नया गावात राहणारे बाबूराम हे आपल्या म्हशीची तक्रार घेऊन शनिवारी नया गाव पोलीस ठाण्यात पोहोचले. म्हैस आपल्याला दूध काढू देत नाही, अशी तक्रार त्यांनी पोलिसांत दिली.
एवढेच नव्हे तर बाबुराम यांनी एक लेखी अर्जही पोलिसांना दिला. पोलिसांनी बाबूरामला समजावून सांगितले. यानंतर बाबूराम माघारी गेले. मात्र, काही वेळाने ते आपल्या म्हशीसह पोलीस ठाण्यात आले. बाबूराम यांनी म्हैस पोलीस ठाण्यात बांधली आणि म्हशीचे दूध आणण्यास मदत करावी, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. हे पाहून प्रकरण इतकं सोपं नसल्याचं नया गाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या लक्षात आलं.
यानंतर नयागाव पोलीस ठाण्याने पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने बाबूराम यांना म्हशीचे दूध कसे काढायचे ते सांगितले. यासोबतच म्हशींना कोणत्याही आजाराची लक्षणे नसल्याची माहितीही देण्यात आली. मात्र, बाबूराम यांना काहीही अडचण आल्यास त्यांना नक्कीच मदत करतील, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. पूर्वी आपली म्हैस रोज पाच लिटर दूध देत होती. गेल्या दोन दिवसांपासून ती दूध काढू देत नाहीए. दूध काढण्यास मदत करा, असं बाबूराम यांनी पोलिसांना सांगितलं.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top