Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबिर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबिर सर्वपक्षीय युवकांचा अनोखा उपक्रम राजुरा येथील ३०१ रक्तदात्याची मामाला अनोखी भेट आमचा विद...












  • देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबिर
  • सर्वपक्षीय युवकांचा अनोखा उपक्रम
  • राजुरा येथील ३०१ रक्तदात्याची मामाला अनोखी भेट
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
तालुक्यातील युवकांचे मामा म्हणून प्रख्यात असलेले देवराव भोंगळे यांच्याप्रती युवकांमध्ये असलेले प्रेम व आपुलकी ज्यामुळे सर्वपक्षीय युवक एकत्र येत राजुरा येथील सुपर मार्केट हॉल येथे ३०१ भाचांनी रक्तदान करीत आपल्या देवराव मामाला वाढदिवसाची अनोखी भेट देत राजुरा शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी रक्तदान शिबीराचे उद्घाटन १०८ क्रमांक रुग्णवाहिकेचे चालक खुशाल लडके यांनी केले, अध्यक्ष सचिन भोयर, प्रमुख पाहुणे राजकुमार डाखरे, श्रीकृष्ण गोरे, सचिन  डोहे, स्वप्नील पाहनपट्टे, आसिफ सय्यद, सुरज गव्हाणे उपस्थित होते. युवकांचे लाडके मामा म्हणजे देवराव भोंगळे यांचा  जन्मदिवस येथील युवक दरवर्षी रक्तदान शिबिर घेऊन साजरा करीत आहे. मात्र यावेळेस देवराव भोंगळे यांना मानणारे सर्वपक्षीय युवक एकत्र येत आपल्या मामाला वाढदिवसाची अनोखी भेट देण्यासाठी मागील दहा दिवसांपासून रक्तदान शिबिराची तयारी करीत होते. रक्तदात्यांची संख्या एवढ्या मोठ्याप्रमाणात होती की, रक्तपिशव्या कमी पडल्यामुळे कित्येक रक्तदात्यांना आल्यापावली परत जावे लागले. प्रथमच राजुरा शहरात देवरावमामा मित्रमंडळ यांनी रक्तदानाचा करीत विक्रमी नोंद केली.
रक्तदान शिबिरात चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तसंक्रमन अधीक्षक डॉ. अनंता हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित चिंदमवार, डॉ. इर्शाद शेख, समाजसेवक प्रसाद शेटे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी जय पचारे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अर्पणा रामटेके, विक्की भगत, शुभांगी पुरटकर, पल्लवी पवार, सुहास भिसे, सचिन निकम, रुपेश दहाडे, शंकर तोगरे, सुखदेव चांदेकर, चेतन वैरागडे, उत्तम सावंत यांची उपस्थिती होती.
रक्तदान शिबीराचे आयोजन देवरवमामा भोंगळे मित्रमंडळाचे सचिन भोयर, राजकुमार, डाखरे, निलेश भोयर, मयूर झाडे, राजू निमकर, असिफ सय्यद, वैभव लांडे, स्वप्नील पहानपट्टे, अंकुश कायरकर, केतन जुनघरे, उत्पल गोरे, सुरज गव्हाणे, लुकेश होकम, नीरज मत्ते, सचिन डोहे, रुपेंद्र ढवस, समीर रासेकर, स्वप्नील रासेकर, मारोती आईलवार, मोहन कलेगुरवार, प्रणव मसादे, आदित्य धोटे, प्रणय विरमलवार, विलास खिरटकर,  मिथुन थिपे,रतन काटोले, चेतन काटोले, नीरज बोबडे, प्रेम झाडे, हर्षल बोबडे,अनिकेत मेश्राम,शुभम राखुंडे, सौरभ मेश्राम, गौरव रामटेके, संदीप पारखी, मंगेश हिंगाणे व देवरवमामा भोंगळे यांना मानणारा युवावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top