Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बल्लारपूर पोलीस स्टेशन तर्फे रक्तदान व नेत्र तपासणी शिवीर संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपूर पोलीस स्टेशन तर्फे रक्तदान व नेत्र तपासनी शिविर संपन्न २०५ लोकांनी केले रक्तदान एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्ला...









बल्लारपूर पोलीस स्टेशन तर्फे रक्तदान व नेत्र तपासनी शिविर संपन्न
२०५ लोकांनी केले रक्तदान
एच.एन. (राजेश) अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
मुंबईत 26/11 ला झालेल्या भ्याड आतंकी हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बल्लारपूर पोलीस स्टेशन तर्फे रक्तदान व नेत्र तपासनी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
स्थानिक पोलीस स्टेशन परिसरात शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह, जेष्ठ नेते शिवचरण द्विवेदी,निलेश खरबडे, समीर केने, कांग्रेस चे करीम भाई, नगरसेवक भास्कर माकोडे, महिला अध्यक्ष अधि. मेघा भाले, शिवसेना चे उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक बल्लारपुर सिक्की यादव, वंचित बहुजन आघाडी चे राजू झोड़े तसेच पत्रकार खेडकर उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर व उपस्थितांतर्फे २६/११ ला झालेल्या भ्याड आतंकी हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर पोलिस स्टेशन परिसरात पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला पोलीस जवानांनी रक्तदान करून केली. शिबिरात जवळपास २०५ लोकांनी रक्तदान केले. गेल्या वर्षीपासून पोलीस निरीक्षक उमेश पाटील २६/११, नेत्र व आरोग्य शिबिराचे आयोजन करीत आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top