Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: युवासेनेने पेट्रोल डिझेल आणि महागाई विरोधात काढली सायकल रैली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संतोष दीक्षित - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनावर युवास...
संतोष दीक्षित - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनावर युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या सूचनेनुसार संपुर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल आणि महागाई विरोधात युवासेने तर्फे राज्यव्यापी आंदोलन राबविण्यात येत असुन जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे व युवासेना जिल्हा प्रमुख निलेश बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना बल्लारपुर शहर प्रमुख बाबा शाहू, महिला उप जिल्हाप्रमुख कल्पना गोरघाटे, अनुदान योजना समिती सदस्य व बल्लारपुर शिवसेना उपशहर प्रमुख शेख युसूफ यांच्या उपस्थितीत सायकल रैली काढण्यात आली होती. केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्व सामान्य जनतेचे हाल होत आहेत या उद्देशाने बल्लारपुर युवासेना चे तालुका प्रमुख निरज यादव, युवासेना शहर प्रमुख बुटले व शहर समन्वयक गौरव नाडमवार यांच्या नेतृत्वाखाली सायकल रैली काढण्यात आली. या रैलीत प्रामुख्याने उपशहर प्रमुख आनंद हनुमंत्तु, सोनु श्रीवास सह शेकडो शिवसैनिकांनी आपली उपस्थिती दर्शवली. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top