Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी व सरदार पटेल यांना अभिवादन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी आर्यन लेडी इंदिरा गांधी स्मृतिदिन आणि लोहपुरु...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी आर्यन लेडी इंदिरा गांधी स्मृतिदिन आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त आज दिनांक ३१ आॅक्टोबर रोजी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही महान नेत्याच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला शहराध्यक्षा सौ संध्या चांदेकर, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सेवादलचे अध्यक्ष दिनकर कर्णेवार, अशोक देशपांडे, अब्दुल गणी अब्दुल हमिद, ॲड सदानंद लांडे, बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू, नगरसेवक गजानन भटारकर, दिपा करमनकर, गीता रोहणे, साधना भाके, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, ॲड चंद्रशेखर चांदेकर, सुमित्रा कुचनकर, पुनम गिरसावळे, योगिता मटाले, रेखा बोढे, वामन वाटेकर, प्रणय लांडे, आकाश मावलीकर, उमेश गोनेलवार यासह काँग्रेसच्या विविध शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top