Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लोकशाही वार्ताचा ‘लोकदीप २०२१’ प्रकाशित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चिमूर - विदर्भाच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्...
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चिमूर -
विदर्भाच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनलेल्या दैनिक ‘लोकशाही वार्ता’च्या लोकदीप दिवाळी २०२१ अंकाचा प्रकाशन सोहळा लोकनेते  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते थाटात पार पडला. दर्जेदार, विचारप्रवर्तक आणि वैविध्यपूर्ण विषयांनी नटलेला हा अंक मनामनात उमेदीचे दीप प्रज्ज्वलित करणारा ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी लोकदीप-२०२१ चा प्रकाशन सोहळा रविवार, ३१ ऑक्टोबर रोजी पार पडला. लोकशाही वार्ताचे संपादक तथा सीईओ भास्कर लोंढे यांनी प्रारंभी ना़ गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर लोकदीप दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले़ लोकदीपच्या संपादनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या उपसंपादक अश्विनी म्हारोळकर-पाचखेडे यांच्यासह शहर संपादक राकेश भिलकर, वरिष्ठ व्यवस्थापक (विकास) रमेश चरडे,  एबी इनकॉर्पोरेशनचे संचालक अक्षय लोंढे आदींची यावेळी उपस्थिती होती. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top