Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या अधिवेशनात मांडणार - आ. किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आंदोलनाला भेट, जाणून घेतल्या कर्मचा-यांच्या मागण्या शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - विविध मागण्यांसाठी एस.टी. महामंडळच्या कर्मच...
  • आंदोलनाला भेट, जाणून घेतल्या कर्मचा-यांच्या मागण्या
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
विविध मागण्यांसाठी एस.टी. महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. परिणामी एस.टी महामंडळाची वाहतूक प्रभावित झाली. दरम्यान  आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या असून या सर्व मागण्या येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे राशिद हुसेन, रुपेश कुंदोजवार, विलास वनकर, अखिल गांवडे, उमेश भानारकर आदिंची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करण्यात यावे, राज्य परिवहन मंडळाचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावा, एस. टी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन या तत्वावर किमान वेतन कायद्यानुसार 1 एप्रिल 2016 पासून 18 हजार मूळ वेतन देण्यात यावे, 7 व्या वेतन आयोगानूसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाजेष्ठतेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राज्य महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर बस स्थानक येथे आंदोलन सुरु केले आहे. दरम्याण आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत सदर कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. ग्रामिण भागांना शहराशी जोडण्याचे काम महामंडळच्या बसेसच्या माध्यमातून केल्या जात आहे. जिथे मार्ग तिथे एस.टी. बस अशी ओळख महामंडळाने तयार केली आहे. महामंडळने प्रवासी लोकांमध्ये विश्वास व आपुलकीची भावना निर्माण केली आहे. हि सर्व उपलब्धी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीतून महामंडळाला मिळाली आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top