Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स सावली - शेतात काम करीत असताना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घ...
  • परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली -
शेतात काम करीत असताना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना नुकतीच घडली. शालीकराम मनिराम चापले वय ३५ असे मृत शेतकऱ्याचे नाव असुन तो गेवरा खुर्द येथील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार धानपीकाचे रोवणे निंदणाच्या कामाला सुरुवात झाली असल्यामुळे अनेक शेतकरी शेतात काम करीत आहेत. सावली तालुक्यातील अनेक ग्रामीण भाग हा जंगल व्याप्त असुन गावालगत शेतीलगत जंगल आहेत अश्या परिस्थितीत शेतात काम करीत असतांना या भागात नेहमीच वन्यजीवाचा हौदोस दिसुन येत आहे. अश्याच घटनेत मृतक हा शेतात काम करण्यासाठी गेला असता शेतालगत असलेल्या जंगल परिसरात दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला शेतकऱ्यावर हल्ला करून जागीच ठार करत जंगल परिसरापर्यंत ओढत नेले. घटनेची माहीती मिळताच काही लोकांनी याबाबत माहिती वन विभागाला दिली. वन अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करत मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबियांना तात्काळ 25 हजाराची मदत दिली. कुटुंबातील कमावता कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबात व गावात शोककळा पसरली आहे.
वाघाच्या हल्लाने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या परिसरात शेती कामासाठी बाहेर निघणे कठीण होऊन बसले आहे त्यामुळे अशा नरभक्षी वाघाला त्वरीत जेरबंद करण्यात यावे. अशी मागणी जोर धरू लागली आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top