Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे भुमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील बाबूपेठ, बगड  खिडकी आणि क्रिष्णा नगर येथील विविध विक...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शहरातील बाबूपेठ, बगड  खिडकी आणि क्रिष्णा नगर येथील विविध विकासकामांचे भुमिपूजन संपन्न झाले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, विश्वजित शाहा, रुपेश पांडे, सलीम शेख, राशिद हुसेन, विनोद अनंतवार, नितीन शाहा, नंदा पंधरे, प्रशांत रोहणकर, तापूष डे, चंद्रशेखर देशमूख, आनंद रणशूर, गौरव जोरगेवार यांची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात विकास कामांना गती आली आहे. अनेक कामांचे भुमिपूजन संपन्न झाले असून कामे प्रगतीपथावर आहे. दरम्यान बाबूपेठ येथील मुख्य मार्ग असलेला जेतवन बुध्द विहार समोरील मार्ग, क्रिष्णा नगर येथील पेविंग ब्लाॅक चे बांधकाम व बगड खिडकी येथील तिन सिमेंट काॅंक्रिट रोड व नालीचे कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामांचे नुकतेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन संपन्न झाले. सदर सर्व कामे पूर्ण होताच येथील नागरिकांची मोठी अडचण दुर होणार आहे. हे कामे करण्यात यावी अशी येथील नागरिकांची जूनी मागणी होती. ति पूर्ण करता आली याचे समाधान आहे. या भागांचा विकास व्हावा यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. येथील काही कामे प्रगतीपथावर आहे. तर अनेक कामे प्रस्तावीत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. कोरोनाच्या संकटामूळे अपेक्षीत असा निधी उपलब्ध करता आला नाही. असे असले तरी विविध माध्यमातून आपण शहराच्या विकासासाठी निधी आणला आहे. हा सर्व निधी दूर्लक्षीत भागात खर्च केल्या जात असल्याचेही ते या भुमिपूजन कार्यक्रमात बोलतांना म्हणाले. यावेळी स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top