Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तंटामुक्त समिती चुनाळाच्या अध्यक्षपदी दिलीप मामा यांची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - ग्राम पंचायत चुनाळा ची आमसभा शासनाने कोरोनाचे थोडेफार निर्बंध हटवल्यामुळे व ग्रामसभा घेण्यास दिलेल्य...
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
ग्राम पंचायत चुनाळा ची आमसभा शासनाने कोरोनाचे थोडेफार निर्बंध हटवल्यामुळे व ग्रामसभा घेण्यास दिलेल्या निर्देशानुसार 31 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. सभेला 162 मतदार सभासदांची उपस्थिती होती. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता असल्यामुळे कधी नव्हे 162 नागरिकांची उपस्थिती होती. या सभेत अध्यक्षपदा करिता झालेल्या निवडणुकीत या गावचे ग्रापं चे माजी सदस्य व शिवाजी महाविद्यालयाचे निवृत्त कर्मचारी हणमंतराव श्रीनिवासराव नाडपेल्ली यांना 12 व्यक्तींनी हात वर करून मतदान केल्यामुळे व व सर्वाधिक नागरिकांनी स्थानिक गोरक्षण सेवा समिती तथा अनाथ छात्रावासाचे व्यवस्थापक दिलीप शत्रुघ्न मैसने मामा यांच्या समर्थनार्थ हात वर करून मतदान केल्यामुळे दिलीप मामा यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळू वडस्कर होते. या ग्रामसभेला ग्रापं च्या सदस्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या निवडी बद्दल सरपंच तथा भाजप चे शक्तिकेंद्र प्रमुख बाळू वडस्कर, माजी सरपंच संजय पावडे, तंटामुक्त समितीचे मावळते अध्यक्ष मनोहर निमकर, ग्रापं सदस्य तथा भाजप चे शाखा प्रमुख रवींद्र गायकवाड, सचिन कांबळे, राजु किणेकर, दिनकर कोडापे, राकेश कार्लेकर, अर्चना आत्राम, उषा करमनकर, जया निखाडे, संतोषी साळवे, संतोषी निमकर, वंदना पिदूरकर, कोमल काटम, प्रकाश आस्वले, भाजप चे बूथ प्रमुख तथा बजरंग दलाचे संदेश दुर्गे, बूथ प्रमुख सुनील कार्लेकर, बूथ प्रमुख मनीष डाहुले, पोलीस पाटील रमेश निमकर, माजी ग्रापं चे माजी सदस्य रमेश मायकुलकर, केशव वांढरे सह येथील नागरिकांनी अभिनंदन करत तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी निवड केल्याबद्धल उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. 







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top