Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पंतप्रधान मोदी यांचा नेतृत्वात देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल - हंसराज अहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवस व मराठा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा शैलेश कोरंगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - भारतीय जनता पार्टी को...
  • पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवस व मराठा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
शैलेश कोरंगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कोरपणा येथे सहाव्या वर्षी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप, पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचा, उज्वला गॅस योजनेतील लाभार्थी तसेच विविध योजनेतील लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा महामंत्री नामदेवराव डाहुले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अरुण मस्की, जिल्हा किसान आघाडी राजू घरोटे, भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश उपलंचीवार, सहकार आघाडी किशोर बावणे, संजय मुसळे, विशाल गज्जलवार, नगरसेवक रामसेवक मोरे, रमेश मालेकर, तालुका महामंत्री नथु ढवस, तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, माजी सरपंच अरुण मडावी, कवडू जरिले, माजी नगरसेवक अमोल आसेकर, माजी सरपंच विजय रणदिवे, शशिकांत आडकिने आदी मान्यवर उपस्थित होते.
अहिर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य नागरिकांच्या  गरजा काय आहे, हे समजून त्यांच्यापर्यंत विविध योजनेचे नियोजन करून सामान्य जनते पर्यंत अनेक योजना पोहोचण्याचे कार्य सतत करीत आहे. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त बोलले की, ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं परंतु राजुरा विधानसभा क्षेत्र हा तब्बल एक वर्ष निजामशाहीच्या गुलामगिरीत राहिला अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वातंत्र्य मिळालं यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या प्रयत्नांचं फलित आज 17 सप्टेंबर मुक्ती संग्राम दिन साजरा करत आहो. हा दिवस प्रत्येक नागरिकांनी साजरा केला पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच देवराव भाऊ भोंगळे जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जगदीश पिंपळकर, प्रमोद पायगन, वासुदेव आवारी, पद्माकर गेडाम, प्रवीण भोयर, सागर दुर्वे मीडिया प्रमुख, दिवाकर गेडाम भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, पुरुष  उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केले तर आभार पुरुषोत्तम भोंगळे यांनी मानले.








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top