राजुरा -
देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना व दोन दिवसानंतर म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्यासह पूर्वीचा राजुरा तालुका व आजचे राजुरा, कोरपना व जिवती हे तालुके निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेततृत्वात झालेल्या लढ्यात या भागातील देशभक्तांनी सुध्दा भाग घेतला होता. निजामाची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी देशाचे पाहिले गृह मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सैन्य चढाई चे आदेश देऊन निजामाच्या राजवटीतून याचदिवशी निजामाच्या अधिपत्याखालील संस्थान आजच्या दिवशी देशात विलीन केले. त्यानिमित्य दरवर्षीप्रमाणे मुक्तीसंग्राम दिनाचे शासकीय ध्वजारोहण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते केले जाते यावर्षी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, भाजपचे जेष्ठ नेते सतीश धोटे, यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार हरीश गाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, नप मुख्याधिकारी पिदूरकर, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, वनपरीक्षेत अधिकारी विदेशकुमार गलगट, नगर सेवक गजानन भटारकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, पत्रकार गणेश बेले, उमाकांत धोटे व प्रतिष्ठित व्यक्तीसह कर्मचारी उपस्थित होते.









टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.