Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नवीन राशन कार्ड धारकांना त्वरित राशन मिळण्याकरिता पाठपुरावा करू - हंसराज अहिर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्थानिक विश्रामगृहात भाजप कार्यकर्त्यांची विविध विषयांवर बैठक आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - गुरुवार दि. २ सप्टेंबर ला स्थानिक विश्...
  • स्थानिक विश्रामगृहात भाजप कार्यकर्त्यांची विविध विषयांवर बैठक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
गुरुवार दि. २ सप्टेंबर ला स्थानिक विश्रामगृहात माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विविध विषयांवर बैठक घेतली. यामध्ये निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्राची अट दूर करणे याबाबत तहसीलदारांना सूचना  देण्यात आल्या तसेच नवीन राशन कार्ड धारकांना राशन कार्ड बनविल्यानंतर 10 महिन्यापर्यंत धान्य मिळत नसल्याबद्दलचा मुद्दा उचलण्यात आला. हा मुद्दा किसान आघाडी सेलचे राजू घरोटे व शेतकरी, शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष करणारे भाजपा तालुका महामंत्री अँड.इंजि. प्रशांत घरोटे यांनी उचलून धरला होता. याबाबत मागील काही महिन्यापासून प्रशांत घरोटे यांनी शासन दरबारी पाठपुरावाही केला होता. याबाबतही जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेशी झालेल्या पत्रव्यवहार बद्दल बोलले असता हंसराज अहिर यांच्या पाठपुराव्याला यश मिळून लवकरच नवीन राशन कार्ड धारकांना सुद्धा राशन मिळणे सुरू होत असल्याचे सांगण्यात आले. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वातील भाजप सरकार असतांना नवीन रेशनकार्ड धारकांना दोन ते तीन महिन्यात राशन मिळणे सुरु होत होते परंतु त्यानंतर चे महाआघाडी सरकारने ही मर्यादा दहा ते ११ महिने केल्यामुळे लाभार्थ्यांचा नुकसान सोसावे लागत आहे. स्थानिक तहसील कार्यालयात राशन कार्ड चा तुटवडा असल्यामुळे नवीन राशन कार्ड साठी अर्ज घेत नसल्याचे जनतेच्या तक्रारीवर सुद्धा तहसीलदार महोदयांना सूचना करण्यात आल्या.
यावेळी भाजप चे वाघुजी गेडाम, राजू घरोटे, भाऊराव चंदनखेडे, अँड.इंजि. प्रशांत घरोटे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व नप शिक्षण व क्रीडा सभापती राधेश्याम अडानिया, सतीश कोमरवेल्लीवार, महादेव तपासे, श्रीनिवास कोपुल्ला, कैलास कार्लेकर, सचिन शेंडे, सईद कुरेशी, मंगेश श्रीराम, सास्ती ग्राम पंचायत सदस्य कृष्णावतार संभोज, राजकुमार भोगा उपस्थित होते. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top