Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: काँग्रेसचा 'गाव चलो अभियानाला' भारोसा येथून सुरुवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महिलांसह ६० युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुर...
  • महिलांसह ६० युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने आजपासून 'गाव चलो अभियानाचा' प्रारंभ करण्यात आला. कोरपना तालुक्यातील भारोसा या गावातून सदर अभियानाला सुरुवात करण्यात आली असून यावेळी महिलांसह ६० युवकांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी गाव चलो अभियानाचे अभियानाचे समन्वयक राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आशिष देरकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश मालेकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजुरकर, नितीन बावणे, बंडु चौधरी, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव मिलिंद ताकसांडे, विधानसभा महासचिव रोशन आस्वले, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे तालुका अध्यक्ष राहुल मालेकर, दिपक पानघाटे, भोयगावच्या सरपंच शालुताई बोंडे, वामन पावडे, नानाजी तोडासे, मनोहर पिदूरकर, मारोती गोखरे, राजेंद्र धोंगळे, भास्कर कुंभे, भगवान धोंगळे, कोकिळा धोंगळे, तानेबाई धोंगळे, शेवंताबाई पावडे, प्रतीक्षा पिदूरकर उपस्थित होते. भारोसा येथील शेतकरी संघटना व भाजपातील अनेक महिलांसह ६० युवकांनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन युवा नेते एकनाथ गोखरे यांनी केले.
काँग्रेस पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे घराघरात पोचविणे, नवीन कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाशी जोडणे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, युवकांना राजकारणाचे महत्व समजावून सांगणे असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रत्येक गावात हे अभियान राबविण्याचा आमचा मानस आहे.
आशिष देरकर माजी अध्यक्ष, राजुरा विधानसभा युवक काँग्रेस








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top