- घरकुल लाभार्थ्यांला ९० हजार मंजूर करण्याकरिता स्वीकारली दोन हजाराची लाच
गडचांदूर -
जिवती तालुक्यातील धोंडार्जुनी येथील एका घरकुल लाभार्थ्याकडून तिसऱ्या टप्यातील रक्कम मंजूर करण्यासाठी दोन हजारची लाच घेणाऱ्या पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंताला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिवती तालुक्यातील धोंडार्जुनी येथील तक्रारदाराचे वडील व आजोबाच्या नावाने घरकुल योजने अंतर्गत दोन लाख 96 हजार रुपये मंजूर झाले होते. बांधकामाच्या तिसरा टप्पा पूर्ण झाल्याने ९० हजार मिळावे यासाठी पंचायत समिती जिवती येथे देयक सादर केले. अभियंता आशिष उत्तमराव शिंदे याने हे बांधकाम पूर्ण झाले की नाही याची धोंडार्जुनीला जाऊन बघितल्यानंतर बिल मंजुरीसाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली मात्र लाभार्थ्यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने लाभार्थ्यांनी आता पैसे नाही, नंतर आणून देतो म्हणून एसीबी कडे तक्रार केली. सापळा रचून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अभियंताला दोन हजार रुपये घेताना पथकाने अभियंताला रंगेहात पकडले.









टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.