Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राष्ट्रीय पोषण आहार महिन्यात राजूराचा "बाळू" झाला पोरका
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कुपोषित बालकांना पोषण आहाराची चळवळ राबविणारे अमित महाजनवार यांची बदली आता कोण प्रयत्न करणार कुपोषित बालकांच्या पोषण आहाराकरिता प्रयत्न समाजम...
  • कुपोषित बालकांना पोषण आहाराची चळवळ राबविणारे अमित महाजनवार यांची बदली
  • आता कोण प्रयत्न करणार कुपोषित बालकांच्या पोषण आहाराकरिता प्रयत्न समाजमनात निर्माण होत असलेला प्रश्न
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
माता आणि बालके सदृढ राहावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी पोषण अभियान राबविले जातात. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविले जाते. त्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा महिला व बालविकास विभागाच्या सर्व संबधित कर्मचाऱ्यांना त्याच्या अंमलबजावणीबाबत सूचना देतात. 
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने यासंदर्भात विविधठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. पोषण आहार हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येतात. मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठीच्या विविध उपायांचा व उपक्रमांचा त्यात समावेश असतो. 
एकीकडे शासन स्तरावर या महिन्यात विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत असली तरी 'हातावर आणायचं आणि पानावर खायचं' अश्या लोकांकरिता अश्या अभियानाचे फारसे फरक दिसून येत नाही. सप्टेंबर महिना सोडल्यास उर्वरित ११ महिने कशी जनजागृती होईल व अत्यंत गरजू लोकांच्या कुपोषित बालकांना पोषण आहार कसा उपलब्ध होईल याकरिता पंचायत समिती राजुरा चे विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांनी त्यांच्या संकल्पनेतून बाळू बी ए पार्ट ऑफ लविंग युनिट ची स्थापना करत जनसहभागातून कुपोषण मुक्तीची चळवळ उभी केली. सघन लोक स्वतःच्या वाढदिवसाला हजारो रुपयांची उधळण करतात त्याच पैश्यात आपण एका कुपोषित बालकाला वर्षभर पुरेल इतका पोषण आहार दिल्यास देशाचे उद्याचे भविष्य कुपोषणमुक्त राहील अशी समाजमनात जनजागृती करत जनसहभागातून मागील तीन-चार वर्षांपासून राजुरा विधानसभा क्षेत्रात जनजागृती सुरु होती. यात आजी-माजी लोकप्रतिनिधींसुद्धा सहकार्य केले. आपणही समाजाकरिता काही देणं लागतो हि भावना मनात ठेऊन अन्य समाजकार्यात वाहून घेणारे लोकही महाजनवारांच्या खांद्या ला खांदा लावून जनजागृती करीत होते. राजुरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यात सुरू असलेल्या "बाळू" चळवळीच्या माध्यमातून शेकडो कुपोषित बालके व गरोदर मातांना पोषण आहार मिळवून देण्यात आला. मात्र कुपोषित बालकांना पोषण आहाराची चळवळ राबविणारे अमित महाजनवार यांची बदली झाल्याने राष्ट्रीय पोषण आहार महिन्यातच राजूराचा "बाळू" पोरका झाला, आता कोण कुपोषित बालकांच्या पोषण आहाराकरिता प्रयत्न करणार असा प्रश्न समाजमनात निर्माण होत आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top