Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भुरकुंडा-पाचगाव व गोवरी-मारडा बससेवा सुरु करण्यासाठी शिवसेनेचे आगगारप्रमुखांना निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांची मागणी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - कोरोना काळात बससेवा चालू नसल्यामुळे तालुक्यात...
  • शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांची मागणी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
कोरोना काळात बससेवा चालू नसल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना विविध कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी खाजगी वाहतूकदार मोठ्या प्रमाणात दरवाढ करून सामान्य जनतेला त्रास देत आहे. तालुक्यातील पाचगाव भुरकुंडा गोवरी मारडा येथील नागरिकांनी शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांना संपर्क करून आपली व्यथा मांडली. आज जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसह आगार प्रमुखांना निवेदन देऊन तात्काळ बससेवा सुरु करण्याची मागणी केली. संबंधित विषयावर चर्चा करून दि. 08/09/2021 बुधवार सकाळी 9 वाजता पासून भुरकुंडा-पाचगाव बससेवा चालू करण्याचे तर गोवरी-मारडा बससेवा एका आठवड्यात चालू करण्याचे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले.
यावेळी बल्लारपूर तालुका समन्वयक प्रदीप गेडाम, युवासेना तालुका प्रमुख अमित (बंटी) मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमूख रमेश झाडे, शिवसेना शाखा प्रमूख पाचगाव मनोज कुरवटकर, युवा सेना शाखा प्रमूख पाचगाव सुनील गौरकर, शाखा सचिव पाचगाव संदीप घ्यार, आकाश जीवतोडे, अंकित कोटरंगे, गणेश ढोले, अंकुश शेंडे, हर्षल कोटरंगे आनंद आदे भुरकुंडा आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top