- गडचांदूरातील मुक्तिधामात मूलभूत सुविधेंचा अभाव
- मुक्तीधामाच्या विकासासाठी तात्काळ ब्लु-प्रिंट तयार करण्याची गरज
- संतप्त नागरिकांनी दिला भिक मांगो आंदोलन सुरू करण्याचा इशारा
- नगर परिषद अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पण पदाधिकाऱ्यांनी तरी लक्ष द्यावे कारण त्यांना इथेच राख व्हायचे आहे
गडचांदूर -
गडचांदुर शहर हे औद्योगिक शहर असून शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकसंख्या वाढत असल्यामुळे सहाजीकच मृत्युचे प्रमाणही वाढत आहे. वाढत्या लोकसंख्या तसेच मृत्युचे प्रमाण लक्षात घेऊन मुक्तीधामाची सुविधा वाढविणे सुध्दा तेवढेच गरजेचे आहे. याबाबत वारंवार नगर परिषदेला सुचना कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातुन देण्यात आल्यावर ही नप पदाधिकारी तथा प्रशासनातर्फे थातुरमातुर साफसफाई करून आपली कर्तव्य पार केल्याचे दाखवीत आहे. जन सार्थक युवा मंच, गडचांदुर या संघटने तर्फे नगराध्यक्षांना एक निवेदन देऊन मुक्तिधामचे नूतनीकरण करून गरजेच्या सोयी उपलब्ध करून देण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
मुक्तीधामच्या ठिकाणी दुःखी झालेली लोकं आपल्या आप्तेष्टाच्या मृत्यु समयी अंत्येष्टी करण्याकरितायेतात. लोकं आपला वेळ त्याठिकाणी काही कालावधीसाठी घालावतात. तिथे येणारा प्रत्येक माणुस हा किमान अर्धा तास त्याठिकाणी आपले दुःख सावरत बेभान अवस्थेत थांबलेला असतो. अश्या वेळी सहाजीकच तिथल्या सुविधा पाहुन तिथली परिसराची दशा पाहुन त्यानांही गावाची दुर्दशा तथा येथील सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कार्यभार लक्षात आल्यामुळे चीड निर्माण होते. काही नागरिक तर नगर परिषद अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे पण पदाधिकाऱ्यांनी तरी लक्ष द्यावे कारण त्यांना इथेच राख व्हायचे आहे असेही म्हणताना आढळतात अश्यात अंत्यविधीसाठी आलेल्या सत्ताधाऱ्यांच्या पक्षात असलेल्या जागृत कार्यकर्त्याची मान लाजेने खाली होते व तो अंत्यसंस्कार अर्धवट सोडून चालता होतो असे पुष्कळ अनुभव येथे नागरिकांना आले आहे.
नुकताच दिनांक १० ऑगस्ट २०२१ ला गडचांदूर येथिल प्रतिष्ठीत नागरीक स्व.शामरावजी ठाणेकर यांचे निधन झाले. यासमयी गावातील बरेच मान्यवर तथा इतर ठिकाणाहुन आलेले त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. स्व. शामरावजी ठाणेकर यांचे प्रेत सरणावर ठेवत असतांना त्याठिकाणी असलेले लोंखडी कटघर त्यांच्या एका नातेवाईकाच्या पायावर पडल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली व जवळपास त्यांच्या पायाच्या सर्व बोटानां फॅक्चर झाले.
शहरातील भौतिक सुविधेवर न.प प्रशासन जेवढे लक्ष देते, त्याच प्रमाणे आपण लोकांच्या पायाभूत सुविधेकडेही तेवढेच लक्ष देणे गरजेचे आहे. निश्चीतच विकासाच्या दृष्टिकोणातुन बघितल्यास भौतिक सुविधा गरजेच्या आहेच परंतु जनतेला पायाभूत सुविधाच उपलब्ध नसेच तर भौतिक सुविधा हया कुचकामी ठरत असतात.
- मुक्तीधामाच्या विकासासाठी तात्काळ एक ब्लु प्रिंट तयार करण्याची गरज
मुक्तीधाम मध्ये निवारा शेड, सिमेंट कॉकटीकरण, झाडे लावून त्यांचे संगोपन, राख वाहुन नेन्याकरीता नाल्यापर्यत अंडरग्राउंड गटार, इलेक्ट्रीक बोरींगची व्यवस्था करून नळव्यवस्था उपलब्ध करून देणे, स्ट्रिट लाईट, बैठक व्यवस्था अदयावत करणे, विसाव्याचे ठिकाण निश्चीत करून एक सुंदर विसावा ओटा तयार करणे, मुक्तीधामचे गेट अद्यावत करणे, २४ तासाकरीता त्याठिकाणी चौकीदाराची तसेच सफाई कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची गरज आहे. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची व्यवस्था होत नसेल तर त्याठिकाणी लाकडे विकण्याकरीता परवानगी देऊन त्यालाच देखभाल व दुरुस्तीचे करार करून घेता येऊ शकतो. प्रसाधन गृह हे मध्यभागी असुन जुने शवविच्छेदन गृहाकडे नवीन प्रसाधन गृह तयार करावे. यासारख्या असंख्य सुविधा करणे अती आवश्यक आहे. येत्या महीन्याभरात सदर कामाचा ठराव घेवुन कामाला लवकरात लवकर सुरूवात करण्यात यावी अशी मागणी जन सार्थक युवा मंच ने केली आहे. या कामाकरीता जर कुठलीही गरज पडल्यास जनसार्थक युवा मंच सहकार्य करण्यास तयार आहे असे निवेदनात त्यांनी स्पष्ट नोंदविले आहे.
- अन्यथा भीक मांगो आंदोलन सुरू करण्याचा इशारा
लवकरच जर या कामासाठी नगर परिषदेने निधी उपलब्ध करून नाही दिली तर शहरात "भीक मांगो आंदोलन" सुरू करण्याचा इशाराही दिला आहे. गडचांदूर येथिल प्रतिष्ठित आणि समाजातील दानशुर व्यक्तीकडुन भीक मागुन सदर निधी नगर परिषदेकडे जमा करून भीक मागलेल्या पैशांनी का होईना पण गडचांदुर करीता एक स्वच्छ, सुंदर आणि सोई-सुविधायुक्त मुक्तीधाम गडचांदुर वासियांच्या सेवेत येईल. यामध्ये नगर परिषदेची कुठलीही बदनामी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद प्रशासन तथा पदाधिकारी यांची राहील असे सांगण्यात आले आहे.














टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.