Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महाआवास अभियानात पिपरी ग्रामपंचायतीची उल्लेखनीय कामगिरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - महाआवास अभियान २०२०-२१ योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय तिसरे पारितोषिक ग्रामपंचायत पिपरीला पालकमंत्...
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
महाआवास अभियान २०२०-२१ योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय तिसरे पारितोषिक ग्रामपंचायत पिपरीला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पिपरीच्या  सरपंच रुंदा विजय कुंभारे, सचिव एन एम शाहा यांना प्रदान करण्यात आले. 









सदर पारितोषिक ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे देण्यात आला. याप्रसंगी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी उपसरपंच ज्ञानेश्वर तिखट, ग्रामपंचायत सदस्य किस्मत शाहिद अली, शालू बोढे, प्रीती तिखट, साईनाथ तिखट, सागर झाडे, संगणक परिचालक श्रीकांत लोंडे, शिपाई राजू तिखट आदींसह सर्व ग्रामपंचायतच्या चमुनी अथक परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top