Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लालपेठ समृद्धी नगरमध्ये मिठाई आणि झेंडे वाटून स्वातंत्र्य दिन साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त समृद्धी नगर येथील भाजपा जिल्हा सचिव चंद्रपूर महानग...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त समृद्धी नगर येथील भाजपा जिल्हा सचिव चंद्रपूर महानगर राजेश येलय्या कोमल्ला यांच्या अध्यक्षतेखाली राजन्ना राजम भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी राजेश कोमल्ला म्हणाले की, जोपर्यंत देशातील प्रत्येक नागरिक राजकारणात रस घेणार नाही, तोपर्यंत आमचा नागरी सेवक, आमदार, खासदार आणि पंतप्रधान कोण व्हावे? ते का असावे जोपर्यंत आपण त्यावर विचारमंथन करत नाही तोपर्यंत आपण योग्य विकास आणि सुशासन मिळवण्यापासून वंचित राहू. राजेश कोमल्ला यांनी सर्व नागरिकांना राजकारणात रस घेण्याचे आणि राजकारणाविषयी माहिती ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपचे तेलुगु समाज शहर अध्यक्ष सूरज सरदम, शैलेश दिंडेवार, दींडेवार, अर्जुन भंडारी, तिरुपति पेरम, सिनु आरूटला, शंकर बोलम, चंदू ओदेवार, विशाखा राजुरकर, रवि झाडे, सिनु अंबरकोंडा, रामचंद्र गोलेवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता समृद्ध युवा बहुद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी राकेश ठाकुर, क्रिष्णा माहुरकर, प्रवीण मद्दीवार, राजेश ठाकुर, अक्षय ईदावार, क्रिष्णा मडे, संपत मडे, मोजेश झाडी इत्यादींनी परिश्रम घेतले. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top